‘शक्तीगड’ व्यायामशाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 10:20 PM2019-02-18T22:20:54+5:302019-02-18T22:21:36+5:30

नक्षल्यांविरोधात मोठी भूमिका पार पाडणाऱ्या गडचिरोली जिल्हा पोलीस दलातील सी-६० जवानांसाठी गडचिरोली येथे अत्याधुनिक व्यायामाच्या उपकरणांनी सुसज्ज ‘शक्तीगड’ व्यायामशाळा उभारण्यात आली. या व्यायामशाळेचे उद्घाटन सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

Starting the gym in 'Shaktigad' | ‘शक्तीगड’ व्यायामशाळा सुरू

‘शक्तीगड’ व्यायामशाळा सुरू

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन : सी-६० जवानांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षल्यांविरोधात मोठी भूमिका पार पाडणाऱ्या गडचिरोली जिल्हा पोलीस दलातील सी-६० जवानांसाठी गडचिरोली येथे अत्याधुनिक व्यायामाच्या उपकरणांनी सुसज्ज ‘शक्तीगड’ व्यायामशाळा उभारण्यात आली. या व्यायामशाळेचे उद्घाटन सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक (नक्षल) मोहीत गर्ग यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्याच्या जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबविणाºया सी-६० जवानांना अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज या व्यायामशाळेमुळे त्यांची शारीरिक सक्षमता वाढविण्यात नक्कीच फायदा होईल. तसेच सी-६० जवानांचे मनोबल उंचावे, असा आत्मविश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी शक्तीगड या व्यायामशाळेतील विविध प्रकारच्या व्यायामाच्या उपकरणांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाहणी केली. यावेळी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Starting the gym in 'Shaktigad'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.