कुटुंबात एखाद्याचे लग्न असले की संपूर्ण कुटुंब आनंदात न्हाऊन निघते. बहिणीचे लग्न असल्यास भावाच्या उत्साहाला पारावार राहात नाही. मात्र कोकडी येथील गुरूदेव उमाजी टिकले (२५) हा भाऊ या बाबतीत अभागी ठरला. लहान बहिणीचे लग्न केवळ एक दिवसावर असताना गुरूदेवची ...
गडचिरोली-चिमूर लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात चामोर्शी तालुक्याला विशेष महत्व आहे. या तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १ लाख ३४ हजार ९०५ मतदार असून यामध्ये ६९ हजार ७०३ पुरूष व ६५ हजार २०२ स्त्री मतदारांचा समावेश आहे. ...
गडचिरोली-चिमूर हा ४०० किलोमीटरपेक्षा जास्त पसरलेला लोकसभा मतदार संघ अवघ्या १२ दिवसात पिंजून काढताना उमेदवारांना दम लागणार आहे. असे असताना काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या गोटात अजूनही निवडणुकीचा ‘माहौल’ थंडच आहे. ...
निवडणुकीच्या काळात मतदारांना दारूचे आमिष देऊन त्यांचे मत पदरात पाडून घेण्याचा प्रकार केवळ गडचिरोलीतच घडत नाही. हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचाही आहे. त्यामुळे दारूमुक्त निवडणूक हे अभियान सगळीकडेच सुरु व्हायला हवे, अशी अपेक्षा डॉ.अभय बंग या ...
तालुक्यातील येलचिलच्या जंगल परिसरात आग लागून वणवा भडकल्याने मौल्यवान वनस्पती व वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने योग्यवेळी उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे. ...
आरमोरी तालुक्यातील मध्यवर्ती व महत्त्वाचे ठिकाण असलेल्या वैरागड येथे अंतर्गत रस्त्यावर बाहेरून येणाऱ्या चारचाकी वाहनांवर वाहतूक कर आकारला जातो. परंतु सदर वाहतूक कर व्यावसायिक व सर्वसामान्यांसाठी नुकसानकारक असल्याने सदर कर रद्द करावा, अशी मागणी येथील ...
कुरखेडा येथील शिवकृपा नागरी सहकारी पतसंस्थेतील कर्जवाटप आणि वसुलीतील दुर्लक्षामुळे निर्माण झालेली स्थिती भाजपाचे उमेदवार नेतेंसाठी अडचणीची ठरणार आहे. या पतसंस्थेचे ते अध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वी तेथील ठेवीदारांच्या असंतोषाचा व्हिडीओ व्हायरल झाला ...
जिल्ह्यातील आलापल्ली वनविभागांतर्गत येत असलेल्या कक्ष क्रमांक १२ मधील राखीव जंगलात ९ इसम २८ मार्चच्या रात्री ११.३० वाजताच्यादरम्यान संशयास्पद स्थितीत फिरताना वन विभागाच्या गस्ती पथकाला आढळून आले. दरम्यान, संशय बळावल्याने त्या सर्वांना अटक करण्यात आली ...
मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनामार्फत विविध उपाय योजले जात आहेत. दुर्गम भागातील भामरागड तालुक्यात ताडगाव येथेसुद्धा बुधवारी रॅली काढून मतदान व आपली भूमिका यावर विस्तृत माहिती देण्यात आली. ...
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात आता ५ उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. या पाचपैकी ३ मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे तर २ नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार आहेत. या लढतीत एकही अपक्ष उमेदवार नाही हे विशेष. ...