गणित हा विषय रटाळ मानला जातो. त्यामुळे या दोन्ही विषयांचे तास सुरू होताच विद्यार्थ्यांना झोप येण्यास सुरूवात होते. ही अडचण लक्षात घेऊन डीआयईसीपीडीतर्फे गणित व इंग्रजी विषयांची कृतीपुस्तिका तयार केली आहे. यामध्ये वेगवेगळे घटक कोणती कृती करून शिक्षकाने ...
एटापल्ली- एटापल्ली तालुक्यात शुक्रवारी सकाळी दमदार पाऊस झाला. त्यामुळे जंगल भागातील नदी, नाल्यांना पूर आला आहे. तालुक्यातील अनेक नदी, नाल्यांवरील पुलांची उंची कमी आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने रहदारी ठप्प झाली होती. ...
गडचिरोली जिल्ह्यात काल पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कहर केला असून अहेरीपासून सात किमी अंतरावर असलेल्या महागाव येथील दोन घरे तर अहेरी येथे एक घर कोसळल्याची घटना घडली आहे. ...
बुधवारी दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात दाणादाण उडविली आहे. अहेरी तालुक्यातील कमलापूर परिसरातील सर्व नाल्यांना पूर आल्याने येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ...
४० वर्षांपूर्वी अंगारा गावात लावलेल्या लोखंडी वीज खांबांपैकी सुमारे २७ खांब जीर्ण झाले आहेत. सदर खांब कोसळून कधीही जीवितहानी होण्याचा धोका असल्याने सदर खांब महावितरणने बदलवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ...
रूग्णवाहिकेने गोंडपिंपरीवरून केवळ आष्टीपर्यंत सोडण्यात आले. आष्टीवरून स्तनदा माता काळीपिवळी वाहनाने आलापल्लीला पोहोचली. आलापल्ली बसस्थानकावरून रात्री ७ वाजता एटापल्ली येथे पोहोचली. प्रवासामुळे स्तनदा माता व बाळाची प्रकृती चांगलीच खालावली. ...
लॉयड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लिमीटेडच्या या लोहखनिज प्रकल्पासाठी कोनसरी येथील जागा दोन वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आली होती. सदर कंपनीला एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावरील जागा लोहखनिज काढण्यासाठी सरकारने लिजवर दिली आहे. ...
छत्तीसगड राज्यातून येणारे मोठमोठे ट्रक सिरोंचा मार्गे तेलंगणा राज्यात जातात. कोटापोचमपल्ली गावाजवळ मुख्य मार्गावर दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी एकमेकापासून काही दूर अंतरावर दोन ट्रक फसले. ...
तालुक्यातील मोहटोला, पेठतुकूम, किटाळी, देलोडा, पाथरगोटायासह आरमोरी शहरातील महिलांनी मंगळवारी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस बांधवांना राखी बांधून दारूबंदीची ओवाळणी मागितली. ‘आम्हाला एक रुपयाही नको, आमच्या गावातील दारूची विक्री थांबवा’ हीच आमची ...