शनिवारच्या सायंकाळपासून रविवारी पहाटेच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील आष्टी, घोट तसेच एटापल्ली तालुक्यात तसेच गडचिरोली शहर व तालुक्यात अवकाळी पाऊस बरसला. इतरही तालुक्यात बऱ्याच ठिकाणी हा अवकाळी पाऊस बरसला. एटापल्ली तालुक्यात शनिवारच्या रात्री जोरदार ...
भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या लाहेरी उपपोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाहेरी, मलमपडुर, भुसेवाडा, कुकामेटा, लष्कर, आलदंडी व गोपणार या भागात नक्षलवाद्यांनी बॅनर व पोस्टर्स लावून नागरिकांनी निवडणूक बहिष्काराचे आवाहन केले होते. मात्र नागरिकांनी आमचा विश्वास ...
गडचिरोली जिल्हा आदिवासीबहुल आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. तसेच नक्षलवादी चळवळीची दहशतही कायम आहे. नक्षलवाद्यांचा लोकशाहीला विरोध असल्याने निवडणूक प्रक्रियेत वेळोवेळी बाधा आणण्याचा प्रयत्न केला जातो. वेळप्रसंगी निवडणुकीत मत ...
सिर्सी या ग्रामपंचायतअंतर्गत आठ गावे येतात. यातील नरोटी माल, नरोटी चक आणि गणेशपूर (२) या गावांमध्ये दारूविक्री बंद आहे. पण विहीरगाव, कुकडी, मोहटोला, गणेशपूर (१) व सिर्सी या गावांमध्ये दारूविक्री होत आहे. विशेष म्हणजे विहीरगावपासून काही अंतरावर असलेल् ...
एटापल्ली तालुक्यातील सर्वच गावे जंगलांनी व्यापले आहेत. बांडे ही या तालुक्यातील प्रमुख नदी आहे. सदर नदी १०० पेक्षा अधिक गावांना वेढा टाकून पुढे जाते. या नदीवर व मोठ्या नाल्यांवर अजूनही पुलांचे बांधकाम करण्यात आले नाही. परिणामी नागरिकांना नदी, नाल्यातू ...
जिल्ह्यातील तीनही मतदार संघांमधील ९३२ केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यापैकी ४५ टक्के केंद्र संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल असल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना शुक्रवारपासूनच तीन हेलिकॉप्टरच्या मदतीने बेस कॅम्पवर नेण्याचे काम सुरू होते. शनिवारीही हे काम सुरूच हो ...
गडचिरोली विधानसभा मतदार संघातील नऊ उमेदवारांनी निवडणुकीदरम्यान मतदारांना दारूचे प्रलोभन देणार नाही आणि दारूचा वापर करणार नाही असे सांगत दारूबंदीला माझे समर्थन आहे असे लेखी वचन दिले आहे. ...
मागील एक वर्षापासून गडचिरोली शहरात राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाला सुरूवात झाली आहे. ज्या ठिकाणी पुलाचे बांधकाम करायचे आहे, तसेच जोडरस्ता येणार आहे, अशा ठिकाणी गॅप ठेवण्यात आली आहे. दोन्ही बाजूने सिमेंट काँक्रिटीकरण झाल्याशिवाय गॅपच्या ठिकाणी योग् ...