शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत पावणेतीन लाख क्विंटल धान खरेदी

By admin | Updated: May 4, 2015 01:32 IST

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालय गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थामार्फत

दिलीप दहेलकर  गडचिरोलीमहाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालय गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थामार्फत आधारभूत किमत खरेदी योजनेंतर्गत २०१४-१५ च्या हंगामात नोव्हेंबर २०१४ ते १ मे २०१५ या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण ५५ केंद्रामार्फत तीन लाख ३३ हजार ७८३ क्विंटल धान खरेदी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या मालकीचे गोदाम नसल्याने खरेदी करण्यात आलेले लाखो क्विंटल धान अद्यापही उघड्यावर असल्याची बाबही उघडकीस आली आहे. आदिवासी विकास महामंडळांतर्गत सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण तीन लाख ३३ हजार ७८३ क्विंटल धान खरेदी करण्यात आली. यापैकी शेतकऱ्यांना ८७ कोटी ८९ लाख ७६ हजार ७१६ रूपयांचे चुकारे अदा करण्यात आले. मात्र महामंडळाला शासनाकडून पुरेसा निधी न मिळाल्यामुळे अद्यापही ५५ हजार १२४ रूपयांचे शेतकऱ्यांच्या धान विक्रीचे चुकारे प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.खासगी व्यापाऱ्यांचा महामंडळाला फटकाजिल्ह्यात अनेक खासगी व्यापारी नगदी चुकारे देऊन व शेतकऱ्यांना आपल्याकडे वळवून त्यांच्याकडून लाखो रूपयांचे धान खरेदी करीत आहे. ग्रामीण भागात थेट वाहन नेऊन अनेक व्यापारी धान खरेदी करीत आहेत. याचा फटका महामंडळाला बसत आहे. महामंडळाचे गडचिरोली प्रादेशिक कार्यालय सहकारी संस्थामार्फत वर्षभरात तीन ते साडेतीन हजार लाख क्विंटल धान खरेदी होणे आवश्यक आहे. मात्र सहा महिन्यांच्या कालावधीत खासगी व्यापाऱ्यांच्या सुळसुळाटामुळे महामंडळाने फारच कमी धान खरेदी केली आहे. यामुळे महामंडळाचे वर्षभरातील धान खरेदीचे उद्दीष्ट अपूर्ण राहण्याची शक्यता आहे.