जिमलगट्टा परिसरात २० टक्केच रोवणी
By Admin | Updated: August 17, 2014 23:10 IST2014-08-17T23:10:59+5:302014-08-17T23:10:59+5:30
यंदा सुरूवातीपासूनच जिमलगट्टा परिसरात अत्यल्प पाऊस झाला. अनेक शेतकऱ्यांनी सुरूवातीस पेरणी केली होती. परंतु पावसाने वेळेवर दगा दिल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला

जिमलगट्टा परिसरात २० टक्केच रोवणी
जिमलगट्टा : यंदा सुरूवातीपासूनच जिमलगट्टा परिसरात अत्यल्प पाऊस झाला. अनेक शेतकऱ्यांनी सुरूवातीस पेरणी केली होती. परंतु पावसाने वेळेवर दगा दिल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले. त्यानंतर पाऊस सुरू झाला. मात्र रोवणीचा हंगाम अल्पावधीपर्यंतच चालला. जिमलगट्टा परिसरात यंदा पाऊस अत्यल्प झाल्याने शेतकऱ्यांची केवळ २० टक्केच रोवणी झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे काम ठप्प पडले आहेत. परिणामी परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
जिमलगट्टा परिसरातील शेतकऱ्यांनी कसे-बसे रोवणी आटोपली आहेत. पंरतु ८० टक्के शेतकऱ्यांचे हंगाम अजुनपर्यंत अर्धवटच आहेत. त्यामुळे शेतकरी पावसाची प्रतिक्षा करीत आहेत. जवळपास मागील २० दिवसांपासून पावसाने जिमलगट्टा परिसरात हजेरी लावली नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धानपऱ्हे करपले आहेत. जिमलगट्टा परिसरात बहुतांश आदिवासी समाज अस्तित्वात आहे. त्यामुळे या समाजाचा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे. खरीप पिकातील उत्पन्नातून शेतकरी वर्षभर आपली उपजीविका करतात. शेतकऱ्यांनी धानपिकास सोयाबीन, कापूस व इतर पिकाचीही लागवड आपल्या शेतात केली आहे. परंतु अल्प पावसामुळे सर्वच पिके धोक्यात आली आहेत. त्या परिसरातील तलाव, बोड्या, नाले व इतर जलसाठे अजुनही अर्धवट स्थितीतच भरलेले आहेत. परिसरात जोरदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना जोरदार पावसाची अजुनही प्रतीक्षा आहे. अनेक युवक कामाच्या शोधात बाहेरगावी जात आहेत. (वार्ताहर)