शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेट समस्येने ऑनलाइन कामाचा बट्ट्याबाेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:25 IST

एटापल्ली : तालुक्याच्या शेवटच्या टोकावर छत्तीसगडला लागून जारावंडी गाव आहे. या परिसरात ५० ते ६० आदिवासीबहुल गावे आहेत. मात्र ...

एटापल्ली : तालुक्याच्या शेवटच्या टोकावर छत्तीसगडला लागून जारावंडी गाव आहे. या परिसरात ५० ते ६० आदिवासीबहुल गावे आहेत. मात्र या भागात कोणतीच बँक नसून इंटरनेटच्या सुविधेचा अभाव आहे. परिणामी या भागातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी व नागरिक त्रस्त झाले आहेत.

सद्य:स्थितीत बँकेत खाते उघडण्यासाठी शासन व प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच प्रत्येक कामासाठी बँकेचे खाते अनिवार्य करण्यात आले आहे. प्रत्येक योजनेचा आर्थिक लाभ, कामाच्या मोबदल्याची रक्कम बँकेच्या खात्यावरच जमा केली जात आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध योजनेचे अर्थसाहाय्य राष्ट्रीयीकृत बँक खात्यामध्ये जमा होते. महिला बचतगटाचा वाढलेला व्याप व विस्तार, वृद्धांना मिळणारे निवृत्ती अर्थसहाय्य, घरकुल योजनेच्या बांधकामाचे अनुदान, रोजगार हमी योजनेच्या कामाचा मोबदला, शेतकऱ्यांची पीककर्ज, सोनेतारण व इतर प्रकारचे कर्ज तसेच विविध योजनेंतर्गत मिळणारी आर्थिक मदत, वैयक्तिक दैनंदिन आर्थिक व्यवहार, असे सर्वच विभाग बँक खात्यामार्फत केले जातात.