शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

कांदे, लसून गडगडले; भाजीपाला स्थिर

By admin | Updated: April 3, 2017 02:22 IST

कांदे व लसूनचा जुना साठा काही प्रमाणात शिल्लक आहे. आता कांदे व लसूनचे नवे उत्पादन आल्याने

गर्दी : लग्न सोहळ्याच्या आयोजनामुळे ठोक स्वरूपात भाजीपाल्यांची विक्री अधिक गडचिरोली : कांदे व लसूनचा जुना साठा काही प्रमाणात शिल्लक आहे. आता कांदे व लसूनचे नवे उत्पादन आल्याने बाजारात कांदे, लसूनची आवक वाढली आहे. परिणामी गडचिरोली येथील रविवारच्या आठवडी बाजारात कांदे व लसूनचे भाव गडगडले होते. मात्र गेल्या एक ते दीड महिन्यापासून भाजीपालांचे दर स्थिर आहे. आजच्या आठवडी बाजारात भाजीपालाचे दर २० ते २५ दिवसांपूर्वीचेच जुने भाव कायम असल्याचे दिसून आले. सध्या उन्हाळ्यात गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र विवाह सोहळ्याची धूम जोमात सुरू आहे. मंगल कार्यालयही आता पूर्णत: बूक झाले आहे. लग्न सोहळ्याच्या आयोजनामुळे गडचिरोली येथील आठवडी बाजारात ठोक स्वरूपात भाजीपाल्याची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. विवाह कार्य असणाऱ्या कुटुंबातील अनेक व्यक्ती रविवारच्या आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करीत असल्याचे दिसून आले. रविवारच्या आठवडी बाजारात वांगे १५ रूपये किलो, टमाटर २० रूपये किलो, आलू १५ रूपये किलो, चवळीच्या शेंगा ३० रूपये किलो, कोहळा २० रूपये किलो, फणस ४० रूपये किलो, भेंडी ३० रूपये किलो, कारले ४० रूपये किलो, फूलकोबी ३० रूपये किलो, हिरवी मिरची ३० रूपये किलो दराने विकली जात होती. गडचिरोलीच्या आठवडी बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने कांद्याचे भाव उतरले होते. १५ रूपये किलो दराने कांदे विकले जात होते. तर लसून ८० रूपये किलो दराने विकले जात होते. भाजीपालाचे भाव स्थिर असले तरी गडचिरोलीच्या आठवडी बाजारात रविवारी ग्राहकांची गर्दी होती. लाल मिरची या बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आणली होती. मिरची बाजारातही ग्राहकांची गर्दी दिसून आली. (स्थानिक प्रतिनिधी)