शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
3
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
4
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
5
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
6
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
7
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
8
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
9
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
10
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
11
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
12
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
13
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
14
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
15
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
16
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
17
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
18
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
19
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
20
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकी वाहनातून आरमाेरीकडे येणारी एक लाखाची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 05:00 IST

वाहनांची तपासणी करत असताना पहाटेच्या सुमारास नागपूर, ब्रह्मपुरीकडून आरमोरीकडे येणाऱ्या एका चारचाकी (झायलो वाहन, क्रमांक एमएच ०३, बीएस-७५०२) वाहनाला अडविण्यात आले. त्या वाहनाची तपासणी केली असता, त्यात एक लाख दोन हजार रुपये किमतीच्या ९० मिलीच्या देशी दारूच्या सीलबंद निप आढळून आल्या. त्यावर रॉकेट प्रवरा डिस्टिलरी, प्रवरानगर असे लेबल होते, मात्र ते फाडलेल्या अवस्थेत होते. 

 लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : येथील ब्रह्मपुरी मार्गावरील नदीघाटावरच्या नाकाबंदी पॉईंटवर आरमोरी पोलिसांनी मंगळवारच्या पहाटे एका चारचाकी वाहनातून होणारी दारू तस्करी हाणून पाडली. त्या वाहनातील एक लाख रुपयांची दारू आणि चार लाख रुपये किमतीचे वाहन, असा एकूण ५ लाखांचा ऐवज जप्त करून दोन जणांना अटक केली. प्राप्त माहितीनुसार, पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्यासह त्यांच्या पथकातील रवींद्र चौके,  नरेश वासेकर, शैलेश तोरपकवार,  एकनाथ ढोरे, देवराव केळझरकर हे आरमोरी शहरात रात्रगस्त पेट्रोलिंग करून वैनगंगा नदीघाटाच्या नाकाबंदी पाॅईंटवर आले. त्या ठिकाणी वाहनांची तपासणी करत असताना पहाटेच्या सुमारास नागपूर, ब्रह्मपुरीकडून आरमोरीकडे येणाऱ्या एका चारचाकी (झायलो वाहन, क्रमांक एमएच ०३, बीएस-७५०२) वाहनाला अडविण्यात आले. त्या वाहनाची तपासणी केली असता, त्यात एक लाख दोन हजार रुपये किमतीच्या ९० मिलीच्या देशी दारूच्या सीलबंद निप आढळून आल्या. त्यावर रॉकेट प्रवरा डिस्टिलरी, प्रवरानगर असे लेबल होते, मात्र ते फाडलेल्या अवस्थेत होते. यावेळी सूरज नामदेवराव बगमारे (३२ वर्षे, रा. बोंडेगाव) याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून एक मोबाईल जप्त करण्यात आला. त्याच्यासह दुसरा आरोपी राहुल प्रकाश मैद (३० वर्षे, रा. ब्रह्मपुरी याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली. पुढील तपास उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे करीत आहेत.

 

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस