एक लाखाची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:25 IST2019-08-12T00:24:44+5:302019-08-12T00:25:07+5:30
गडचिरोली पोलिसांनी आरमोरी मार्गावरील फुले वार्डात कारवाई करून १ लाख ८ हजार रुपये किमतीची दारू व तीन लाख रुपये किमतीची कार जप्त केली आहे. सदर कारवाई शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

एक लाखाची दारू जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी आरमोरी मार्गावरील फुले वार्डात कारवाई करून १ लाख ८ हजार रुपये किमतीची दारू व तीन लाख रुपये किमतीची कार जप्त केली आहे. सदर कारवाई शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
आरमोरी मार्गे गडचिरोली शहरात दारू आणली जात असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांनी आरमोरी मार्गावरील वन विभागाच्या नाक्याकडून फुले वार्डाकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी पाळत ठेवली. दारू घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग केला असता, दारूचे वाहन रस्त्यावरील चिखलात फसले. वाहनचालकाने वाहन त्याच ठिकाणी सोडून पळ काढला. वाहनाची तपासणी केली असता, वाहनात १८ पेट्या दारू आढळून आली. त्याची किंमत १ लाख ८ हजार रुपये होते. दारूसह तीन लाख रुपये किमतीचे वाहन सुध्दा पोलिसांनी जप्त केले आहे. सदर कारवाई गडचिरोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप चौगावकर, सहायक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर उदार, हवालदार आत्माराम गोनाडे यांनी केली आहे.
सदर वाहन व दारू नेमकी कुणाची आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.