दुचाकी अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 23:58 IST2019-07-13T23:58:04+5:302019-07-13T23:58:48+5:30
नहरावरील पुलाच्या खांबाला दुचाकीची धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मागे बसलेला एक व्यक्ती गंभीर जखमी असून मुलगा सुखरूप आहे. सदर घटना कुरूळ जवळ सायंकाळी ६ वाजता घडली.

दुचाकी अपघातात एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : नहरावरील पुलाच्या खांबाला दुचाकीची धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मागे बसलेला एक व्यक्ती गंभीर जखमी असून मुलगा सुखरूप आहे. सदर घटना कुरूळ जवळ सायंकाळी ६ वाजता घडली.
रूपेश शामसुंदर दुधबळे रा. मनोरा ता. बल्लारपूर असे मृतकाचे नाव आहे. रूपेश हा एमएच ३३ बीएम ७९९६ क्रमांकाच्या दुचाकीने तळोधी येथील सासूरवाडीला जात होता. दरम्यान कुरूळ गावाजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी पुलाच्या खांबाला जाऊन धडकली. दुचाकीची धडक जबर असल्याने रूपेशचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मागे बसलेला इसम गंभीर जखमी झाला आहे. त्याला जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले आहे. त्याचे नाव कळू शकले नाही. याच दुचाकीवर लहान मुलगा बसला होता. त्याला मात्र कोणतीही इजा झाली नाही. घटनेबाबत चामोर्शी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.