लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : मिनीडोअर वाहनाचे टायर फुटल्याने एक ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास पांढरसडा गावातील बसस्थानकाजवळ घडली.चातगावपासून दोन किमी अंतरावर येत असलेल्या पांढरसडा बसस्थानकाजवळ भरधाव एमएच ३४ आरजी २८९ क्रमांकाच्या मिनीडोअर वाहनाचे टायर फुटले. टायर फुटताच वाहन अनियंत्रित होऊन झाडाला धडकले. यामध्ये चालक किसन सटू भगाडे (२०) हा ठार झाला तर कैलास सटू भगाडे (३०) व आकाश शंकर भगाडे (१५) हे जखमी झाले. हे तिघेही चंद्रपूर येथील इंदिरा नगरातील रहिवासी आहेत. यातील किसन व कैलास हे दोघे सखे भाऊ आहेत. सदर वाहन भंगार खरेदी करण्यासाठी धानोरा येथे येत होते. दरम्यान अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरिक्षक जाधव यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून तिघांनाही गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी किसनला मृत घोषित केले. इतर दोघांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी धानोराचे माजी उपाध्यक्ष ललित बरच्छा यांचा काही महिन्यांपूर्वी अपघात झाला. तसेच याच आठवड्यात दुसऱ्या एका अपघातात एका इसमाचा मृत्यू झाला, हे विशेष.
मिनीडोअरच्या अपघातात एक ठार, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:17 IST
मिनीडोअर वाहनाचे टायर फुटल्याने एक ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास पांढरसडा गावातील बसस्थानकाजवळ घडली.
मिनीडोअरच्या अपघातात एक ठार, दोन जखमी
ठळक मुद्देवाहनाचे फुटले टायर : पांढरसडा गावाजवळची घटना