वन कर्मचारी २५ पासून बेमुदत संपावर जाणार

By Admin | Updated: August 20, 2014 23:32 IST2014-08-20T23:32:18+5:302014-08-20T23:32:18+5:30

राज्यासह जिल्हाभरातील वनरक्षक, वनपालाच्या वेतन श्रेणीची मागणी २० वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित आहेत. यामुळे वनकर्मचाऱ्यांवर वनकर्मचाऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे.

One employee will go on strike for 25 | वन कर्मचारी २५ पासून बेमुदत संपावर जाणार

वन कर्मचारी २५ पासून बेमुदत संपावर जाणार

गडचिरोली : राज्यासह जिल्हाभरातील वनरक्षक, वनपालाच्या वेतन श्रेणीची मागणी २० वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित आहेत. यामुळे वनकर्मचाऱ्यांवर वनकर्मचाऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. वेतन श्रेणीत सुधारणा करण्याबाबत वनमंत्री, वित्तमंत्री, वनराज्यमंत्री व प्रधान मुख्यमंत्री संरक्षकांकडे संघटनेचे राज्याध्यक्ष अजय पाटील याने अनेकदा चर्चा केली. मात्र शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे वनरक्षक व पदोन्नतर वनपाल संघटनेच्या नेतृत्वात जिल्ह्यातील जवळपास पाच हजार वनपाल, वनरक्षक व वनमजूर २५ आॅगस्टपासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्थानिक पत्रकार भवनात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना संघटनेचे केंद्रीय संघटक सुनील खोब्रागडे म्हणाले, ४ जुलै रोजी वनराज्यमंत्री उदय सावंत यांच्यासोबत वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली. सुधारित वेतन श्रेणीचा मुद्दा सध्या राज्याच्या वित्त विभागाकडे प्रलंबित आहे. सदर वेतन श्रेणीची मागणी तत्काळ निकाली काढण्यात यावी, या मागणीला घेऊन संघटनेचे राज्याध्यक्ष अजय पाटील व पदाधिकाऱ्यांनी नागपूरच्या मुख्य वनसंरक्षकाकडे ५ आॅगस्ट रोजी लेखी निवेदन दिले, तसेच चर्चा घडवून आणली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली, असेही ते म्हणाले. पत्रपरिषदेला जिल्हाध्यक्ष अरूण पेंदोरकर, मोतीराम चौधरी, अनंत ठाकरे उपस्थित होते.

Web Title: One employee will go on strike for 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.