शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
2
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
3
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
4
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
5
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
6
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
7
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
8
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
9
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
10
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
11
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
12
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
13
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
14
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
15
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
16
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
17
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
18
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
19
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
20
अमित शाह फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक

अन्यायाविरोधात ओबीसी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 1:31 AM

निवडणुकीपूर्वी पुढाऱ्यांनी दिलेले जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्याचे आश्वासन हवेत विरले आहे. त्यामुळे सर्व प्रमुख पक्षाविरोधात ओबीसी बांधवांमध्ये रोष आहे.

ठळक मुद्देसभेत रणनीतिवर मंथन : आरक्षणाच्या मुद्यावर वेगळ्या राजकीय पर्यायाच्या शोधात

लोकमत न्यूज नेटवर्कतुळशी : निवडणुकीपूर्वी पुढाऱ्यांनी दिलेले जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्याचे आश्वासन हवेत विरले आहे. त्यामुळे सर्व प्रमुख पक्षाविरोधात ओबीसी बांधवांमध्ये रोष आहे. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान ओबीसी बांधवांनी वेगळा राजकीय पर्याय काढून आपल्या हक्कासाठी ताकद दाखवावी, असा सूर उपस्थित मान्यवरांनी व संघटनेच्या विविध पदाधिकाºयांनी सभेत काढला.देसाईगंज तालुका राष्टÑीय ओबीसी महासंघाच्या वतीने रविवारी देसाईगंज तालुक्याच्या आमगाव येथील राम मंदिरात ओबीसी समाजाची सभा पार पडली. यावेळी ओबीसींचे आरक्षण व विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली.यावेळी संघटनेचे पदाधिकारी व बांधवांनी व्यक्त केलेल्या मतातून देसाईगंज तालुक्यातील ओबीसी बांधव एकवटले असल्याचे दिसून आले.सभेच्या अध्यक्षस्थानी धनपाल मिसार होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य रमाकांत ठेंगरी, राष्टÑीय ओबीसी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर, मुरलीधर सुंदरकर, ओबीसी युवा महासंघाचे अध्यक्ष रूचित वांढरे, चौधरी, मस्के, पं.स.सदस्य अर्चना ढोरे, विसोराच्या सरपंच मंगला देवढगले, आमगावचे सरपंच योगेश नाकतोडे, सावंगीचे सरपंच राजेंद्र बुल्ले, नितीन राऊत, प्रा.दामोधर शिंगाडे, कमलेश बारस्कर, श्यामराव तलमले, नगरसेवक सचिन खरकाटे, राजेंद्र गुल्ले, प्रभाकर चौधरी, महेश झरकर, लोकमान्य बरडे, ज्ञानेश्वर पिल्लारे, ज्ञानेश्वर कवासे, गौरव नागपुरकर, सुनील पारधी, चैतनदास विधाते, अरूण राऊत, सागर वाढई, विलास ठाकरे, विष्णू नागमोती, शंकर पारधी, प्रशांत देवतळे, विनायक अलोणे, दीपक प्रधान, प्रदीप तुपट, पंकज धोटे आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील ओबीसींचे विविध प्रश्न मार्गी लावण्याबाबत विद्यमान लोकप्रतिनिधी व यापूर्वीच्याही सत्ता पक्षातील लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले. त्यामुळे विविध पक्षात असलेल्या ओबीसी पदाधिकाºयांनी पक्षातील व निवडून आलेल्या पदाचा राजीनामा द्यावा, असा सूर यावेळी काढण्यात आला.संचालन व आभार विष्णू दुनेदार यांनी मानले. यशस्वीतेसाठी राष्टÑीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. 

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जाती