लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यांकन करूनच वार्षिक पगारवाढ देण्याबाबतचे पत्र आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांनी काढले आहे. याला विरोध करण्यासाठी राज्यभरातील एनआरएचएम कर्मचाऱ्यांनी ११ एप्रिलपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. गडचिरोली जिल्ह्यातीलही कर्मचाºयांनी या आंदोलनात सहभाग घेतला.संपूर्ण राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात सुमारे १८ हजार पेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी व अधिकारी मागील १० वर्षांपासून अल्पशा मानधनावर कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना कामाचा अनुभव आहे. त्यामुळे शासनस्तरावर रिक्त असलेल्या जागांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, २ एप्रिल रोजीचे अन्यायकारक परिपत्रक रद्द करण्यात यावे, पूर्वीप्रमाणेच मानधनवाढ देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले.
एनआरएचएम कर्मचारी कामबंद आंदोलनावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:37 IST
गडचिरोली : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यांकन करूनच वार्षिक पगारवाढ देण्याबाबतचे पत्र आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांनी काढले आहे. याला विरोध करण्यासाठी राज्यभरातील एनआरएचएम कर्मचाऱ्यांनी ११ एप्रिलपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे.
एनआरएचएम कर्मचारी कामबंद आंदोलनावर
ठळक मुद्देशासनाला पाठविले निवेदन : मूल्यांकनानंतर मानधनवाढ देण्याचे परिपत्रक रद्द करा