सूचना - रॅट तपासणी म्हणजे नेमकी कोणती टेस्ट? आतापर्यंत अँटिजेन किंवा आरटीपीसीआर तपासणी असे दोनच उल्लेख आले आहेत कोरोनाच्या बातमीत.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:37 IST2021-04-24T04:37:05+5:302021-04-24T04:37:05+5:30
धानोरा : धानोरा तालुक्यात एप्रिलपर्यंत एकूण ८७४१ नागरिकांची रॅट तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण ७३५ नागरिक कोरोनाबाधित आढळून ...

सूचना - रॅट तपासणी म्हणजे नेमकी कोणती टेस्ट? आतापर्यंत अँटिजेन किंवा आरटीपीसीआर तपासणी असे दोनच उल्लेख आले आहेत कोरोनाच्या बातमीत.
धानोरा : धानोरा तालुक्यात एप्रिलपर्यंत एकूण ८७४१ नागरिकांची रॅट तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण ७३५ नागरिक कोरोनाबाधित आढळून आले, तसेच ८ नागरिक मृत्युमुखी पडले.
कोरोनाची पहिली लाट सुरू झाली त्यानंतर नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून काही दिवसांनी धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात रॅट तपासणी केंद्र सुरू करण्यात आले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे ही रॅट तपासणी सुरू आहे. यामध्ये ग्रामीण रुग्णालयातर्फे २२ एप्रिलपर्यंत एकूण ७१४० नागरिकांची रॅट तपासणी करण्यात आली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे एकूण १६०१ नागरिकांची रॅट तपासणी करण्यात आली. एकूण ८७४१ नागरिकांची तपासणी करण्यात आली असता ७३५ नागरिक कोरोनाबाधित आढळून आले. तसेच ८ नागरिकांचा मृत्यू झाला. १४१६ नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वीरेंद्र भावे यांनी दिली. तसेच सर्दी, खोकला, ताप अशी कोरोनाची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता सुरुवातीलाच रॅट तपासणी करावी, असे आवाहन डॉ. भावे यांनी केले.