शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील गावात नोटाचीच धूम

By admin | Updated: October 22, 2014 23:17 IST

विधानसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रात घेण्यात आलेल्या मतदानात लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत नोटाचा टक्का वाढला. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात पोस्टल मतदानासह १७ हजार ५१० मतदारांनी

गोपाल लाजुरकर - गडचिरोलीविधानसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रात घेण्यात आलेल्या मतदानात लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत नोटाचा टक्का वाढला. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात पोस्टल मतदानासह १७ हजार ५१० मतदारांनी नोटाचा वापर केला. गडचिरोली शहरातील ४२ बुथवर ५ हजार १०० मतदारांनी नोटाला पसंती दर्शविली. काही गावात निवडणुकीवरील बहिष्कारामुळे अत्यल्प मतदान झाले. परंतु गडचिरोली विधानसभा क्षेत्रात नोटा तीसऱ्या क्रमांकावर राहिल्याने पक्षीय मतदानापेक्षा नोटाचीच धूम सर्वाधिक होती. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात १ लाख ६२ हजार ४९४ मतदारांनी मतदान केले. यात १ हजार १२३ पोस्टल मतदारांचा समावेश होता. पोस्टल मतदानासह गडचिरोली विधानसभा क्षेत्रात १७ हजार ५१० मतदारांनी नोटाचा वापर केला. गडचिरोली शहरातील ४२ मतदान केंद्रावर ५ हजार १०० मतदारांनी नोटाचा वापर केला. धानोरा येथील ४ मतदान केंद्रावर ६८९ मतदारांनी नोटाचा वापर केला. चामोर्शी शहरातील ११ मतदान केंद्रावर ३६७ जणांनी नोटा वापरला. विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदानावर बहिष्कार घालणाऱ्या कुनघाडा रै. गावात ५ मतदान बुथ केंद्रावर ४१ जणांनी नोटाचा वापर केला. आष्टीतील ४ मतदान केंद्रावर ७४, घोट येथील ३ मतदान केंद्रावर २२१ जणांनी नोटाला पसंती दर्शविली. पोर्ला येथील ३ मतदान केंद्रावर २६५, गोगाव येथील २ मतदान केंद्रावर १५६, राजघाटा चक येथील २ मतदान केंद्रावर २३५, काटली येथील २ मतदान केंद्रावर १८८ तर अडपल्ली येथील एका मतदान केंद्रावर २११ जणांनी नोटाचा वापर केला. शहरानजिक असलेल्या नवेगाव येथील ५ मतदान केंद्रावर ५६३ जणांनी नोटाचा वापर केला तर कोटगल येथील ३ मतदान केंद्रावर २१२ जणांनी नोटाला पसंती दर्शविली. धानोरा तालुक्यातील मोहली येथे १४०, सालेभट्टी येथे १०९, राजोली येथे १७२, दुधमाळा ६३, कटेझरी येथे ४८, चातगाव येथे ६६ जणांनी नोटाचा वापर केला. चामोर्शी तालुक्यातील आमगाम महाल येथील २ मतदान केंद्रावर अनुक्रम १२७, १२१, हिवरगाव येथे १४०, अनंतपूर ६३, पावीमुरांडा येथे ३०, भाडभिडी ७० जणांनी नोटाला पसंती दर्शविली. चामोर्शी तालुक्यातील अनेक गावांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे काही गावात अत्यल्प मतदान झाले. त्यामुळे एकुण मतदानाच्या टक्केवारीत घट झाली. क्षेत्राच्या ग्रामीण भागातही नोटाचा वापर झाला.