गैरआदिवासी उतरणार रस्त्यावर

By Admin | Updated: August 13, 2014 23:52 IST2014-08-13T23:52:15+5:302014-08-13T23:52:15+5:30

पेसा कायद्याची अंमलबजावणी स्थगीत करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी गैर आदिवासी सुशिक्षित बेरोजगार संघटनेच्यावतीने १४ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

Non-tribal descendants on the road | गैरआदिवासी उतरणार रस्त्यावर

गैरआदिवासी उतरणार रस्त्यावर

गडचिरोली : पेसा कायद्याची अंमलबजावणी स्थगीत करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी गैर आदिवासी सुशिक्षित बेरोजगार संघटनेच्यावतीने १४ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच शाळा व महाविद्यालयही बंद ठेवण्यात येणार आहे. या मोर्चाला विविध संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
नोकरीसंबंधीचा पेसा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठीच्या आंदोलनाला भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ओबीसी संघर्ष कृती समिती जिल्हा गडचिरोली, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, एनएसयूआय, युवाशक्ती संघटना, गडचिरोली विधानसभा युवक काँग्रेस, सोनार समाज सेवा संस्था गडचिरोली, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सम्यक विद्यार्थी आंदोलन, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, नॅशनल स्टुडंट युनियन आॅफ इंडिया, जिल्हा महिला काँग्रेस कमिटी यांच्यासह जिल्ह्यातील इतर संघटनांनी गैर आदिवासी युवकांनी नोकरी संबंधीच्या पेसा कायद्याविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला आहे.
सुशिक्षित बेरोजगार संघटनेच्या उपोषण मंडपाला जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील विविध संघटनांच्यावतीने भेटी देण्यात आल्या आहेत. तसेच १४ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात अनेक संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील गैर आदिवासी जनतेने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन महेंद्र ब्राह्मनवाडे, विश्वास भोवते, प्रशांत वाघरे, पंकज गुड्डेवार, भाष्कर बुरे, निखिल सोमनकर, सत्यनारायण भांडेकर, संतोष बोलुवार, राकेश कोठारे, नितीन चलाख, संतोष गव्हारे, साईनाथ भोयर, राकेश वासेकर, गुणवंत टिकले, नितेश राठोड, रूपेश भोपये, अंकित पित्तुलवार, जयंत पेद्दीवार, उमेश बाटवे, राष्ट्रीय जनहितवादी युवा समिती व अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
सुशिक्षित बेरोजगार संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. यामध्ये ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अरूण पाटील मुनघाटे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष संदीप सहारे, नगरसेवक नंदू कायरकर, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वाढई, नॅशनल स्टुडंट युनियन आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नगरमंत्री मंगेश दुधबावरे, नॅशनल स्टुडंट युनियन आॅफ इंडियाचे महासचिव नितेश राठोड, नगर परिषदेचे गटनेते राजेश कात्रटवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विश्वासराव देशमुख, सोनार समाजसेवा संस्थेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष निखिल मंडलवार, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. राम मेश्राम, नगरसेविका लता मुरकुटे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य विनोद शनिवारे, गडचिरोली विधानसभा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अतुल मल्लेलवार, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष भावना वानखेडे, जनहितवादी युवा समिती, सुशिक्षित बेरोजगार संघटना एटापल्ली आदींनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.

Web Title: Non-tribal descendants on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.