नऊ महिन्यांपासून क व्हरेज गुल
By Admin | Updated: August 7, 2014 23:58 IST2014-08-07T23:58:06+5:302014-08-07T23:58:06+5:30
सिरोंचा तालुक्याच्या टोकावर व अतिदुर्गम भागात वसलेल्या झिंगानूर परिसरातील दूरसंचार सेवा ९ महिन्यांपासून ठप्प असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. मागील ९ महिन्यांपासून दूरसंचार सेवा

नऊ महिन्यांपासून क व्हरेज गुल
झिंगानूर : सिरोंचा तालुक्याच्या टोकावर व अतिदुर्गम भागात वसलेल्या झिंगानूर परिसरातील दूरसंचार सेवा ९ महिन्यांपासून ठप्प असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. मागील ९ महिन्यांपासून दूरसंचार सेवा ठप्प असल्याने परिसरातील ८ ते १० गावातील ग्राहक व नागरिकांना तालुका मुख्यालयात जाऊन आपली कामे करावी लागत आहेत. मात्र दूरसंचार विभागाचे दुर्गम भागातील सेवा सुरळीत करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे झिंगानूर परिसरातील दूरसंचार सेवा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्राहकांनी दिला आहे.
झिंगानूर परिसरात बीएसएनएल, डब्ल्यूएलएल सेवा उपलब्ध करण्यात आली होती. परिसरातील अनेक ग्राहकांनी ९३४ रूपये खर्च करून तरंग फोन विकत घेतले होते. त्यामुळे परिसरातील ४० च्यावर ग्राहकांनी तरंग फोन घरी बसविले होते. काही दिवस दूरसंचार विभागामार्फत सुरळीत सेवा पुरविण्यात आली. त्यानंतर मागील नोव्हेंबर २०१३ पासून बीएसएनएल, डब्ल्यूएलएल तरंग सेवा बंद करण्यात आली आहे. परिणामी ग्राहकांना इतरत्र संपर्क साधतांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. यासंदर्भात ग्राहकांनी वारंवार दूरसंचार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे संपर्क करून आपल्या म्हणणे मांडले. तरंग सेवा सुरळीत करण्याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रारीही करण्यात आले. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले. त्यामुळे झिंगानूर परिसरातील ग्राहकांना भ्रमणध्वनी, दूरध्वनी सेवेचा फायदा होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.
९ महिन्यांपासून झिंगानूर परिसरातील दूरसंचार सेवा ठप्प असतांनाही वरिष्ठ अधिकारी का लक्ष घालत नाही, असा परखड सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. झिंगानूर परिसर अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जातो. दूरसंचार सेवेचा परिसरातील नागरिकांना फायदा होत नसल्याने ९ महिन्यांपासून सेवा ठप्प पडली आहे. ग्राहकांचे पैशे परत द्यावे, अथवा तरंग सेवा सुरळीत करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्राहकांनी दिला आहे. (वार्ताहर)