New chairman of city council | २० ला ठरणार नगर परिषदांचे नवे सभापती

२० ला ठरणार नगर परिषदांचे नवे सभापती

ठळक मुद्देबैठका सुरू : गडचिरोली व देसाईगंजमध्ये निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली व देसाईगंज नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती पदाची निवडणूक २० जानेवारी रोजी घेतली जाणार आहे.
गडचिरोली नगर परिषदेतील सभापतींची निवड करण्याबाबत चर्चा करण्यासाठी नगरसेवक व भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी सर्कीट हाऊसमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, प्रशांत वाघरे आदी उपस्थित होते. ज्या नगरसेवकांना सभापती पद अजूनर्यंत मिळाले नाही. त्यांना संधी देऊन सभापती पद बनविण्यात यावे, असा विचार मांडण्यात आला. मात्र यावर काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदविला. काही नगरसेवक फारसे सक्रीय नाही. अशा नगरसेवकांकडे सभापती पद देऊन काहीच फायदा नाही. त्याऐवजी जे नगरसेवक नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सक्रीय आहेत, तसेच पक्ष वाढविण्यासाठी काम करीत आहेत, त्यांना प्राधान्य देण्यात यावे. अशी भूमिका मांडली.
या भूमिकेचे काही नगरसेवकांनी समर्थन केले. मात्र पहिल्या सभापती निवडीच्या वेळीच सर्व नगरसेवकांना सभापती पद दिले जाईल, असे ठरले होते, हा मुद्दा सुध्दा समोर आला. त्यानुसार सभापती पदे ज्या नगरसेवकांना अजूनपर्यंत संधी मिळाली नाही, त्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

नावे गुलदस्त्यात
आजपर्यंत संधी न मिळालेल्या नगरसेवकांना सभापतिपद देण्याचे ठरविण्यात आले. मात्र नेमके कोण सभापती बनणार त्यांची नावे अजुनही गुलदस्त्यात आहेत. १९ जानेवारी रोजी रात्री नावे सांगितली जाणार आहेत. त्यांनाच मतदान करायचे आहे, असा निर्णय सभेत झाला.

Web Title: New chairman of city council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.