शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

गुणवत्तेसाठी दर्जेदार शैक्षणिक साहित्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 6:00 AM

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या वतीने आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत ३० नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय शिक्षणवारीचे आयोजन डीआयईसीपीडीच्या प्रांगणात करण्यात आले. या शिक्षणारीचे उद्घाटन डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर होत्या.

ठळक मुद्देसंडे अँकर । जिल्हास्तरीय शिक्षणाची वारी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये गुणवत्ता आहे. या गुणवत्तेला चालना देण्याची गरज आहे. गुणवत्तापूर्ण अध्यापन होण्यासाठी शिक्षकांनी आग्रही असले पाहिजे. त्यासाठी विविध शैक्षणिक साहित्यांचा वापर केला पाहिजे. येथील शिक्षकांनी तयार केलेले शैक्षणिक साहित्य व अवलंबलेली अध्यापन पध्दती राज्यातील इतर जिल्ह्यांना मार्गदर्शक ठरेल असे प्रयत्न करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या वतीने आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत ३० नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय शिक्षणवारीचे आयोजन डीआयईसीपीडीच्या प्रांगणात करण्यात आले. या शिक्षणारीचे उद्घाटन डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून डीआयईसीपीडीचे प्राचार्य शरदचंद्र पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजकुमार निकम, प्राथमिक शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. विनित मत्ते, संभाजी भोजने आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद शिक्षणासाठी निधी कमी पडू देणार नाही. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल व शिकविलेले विद्यार्थ्यांना लक्षात येईल, यासाठी जास्तीत जास्त शैक्षणिक साहित्यांचा वापर करावा, असे आवाहन केले. प्रास्ताविक प्राचार्य शरदचंद्र पाटील, संचालन अधिव्याख्याता पुनित मातकर तर आभार वैशाली एगलोपवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी डीआयईसीपीडीचे कर्मचारी, जिल्हाभरातील गटसाधन व्यक्ती, शिक्षक यांनी सहकार्य केले.नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्यएखाद्या शिक्षकाने तयार केलेले नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य इतरही शिक्षकांना माहित व्हावे, या उद्देशाने सर्वप्रथम तालुकास्तरावर शैक्षणिक वारीचे आयोजन करण्यात आले होते. तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविलेल्या शिक्षकांना जिल्हास्तरीय शिक्षणवारीत सहभागी होण्याची संधी देण्यात आली होती. जिल्हास्तरीय शिक्षणवारीत भाषा, गणित, इंग्रजी, सामाजिकशास्त्र, विज्ञान, माहिती तंत्रज्ञान या सहा विषयांचे प्रत्येकी ११ असे एकूण ६६ शैक्षणिक साहित्य ठेवण्यात आले होते. भामरागड तालुका सहभागी झाला नव्हता.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र