शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सरकारला पाठविले गोवऱ्यांचे पार्सल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 18:44 IST

LPG Gas Cylinder Price Hike : गॅस दरवाढीविरोधात एटापल्लीत एकदिवसीय आंदोलन.

ठळक मुद्देगॅस दरवाढीविरोधात एटापल्लीत एकदिवसीय आंदोलन.

एटापल्ली (गडचिरोली) : घरगुती वापराच्या गॅसच्या किमती भरमसाठ वाढून सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्याचा निषेध म्हणून येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी चूल पेटविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शेणाच्या गोवऱ्यांचे पार्सल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे पोस्टाने पाठविले. याशिवाय आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी शुभम गुप्ता यांना निवेदनही सादर केले.

महिलांच्या आरोग्याचा विचार करून मोठ्या मनाने आपल्या प्रधानसेवकांनी उज्ज्वला गॅस योजना आणली. दुसरीकडे दर १५ दिवसांनी गॅस सिलिंडरच्या किमती वाढविल्या जात आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने ही योजना सुरू झाली त्याचा मूळ हेतूच नष्ट झाला आहे. आता महिलांना पुन्हा चुलीकडे चला, असे म्हणण्याची वेळ आली असल्याची भावना यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्य माणूस आर्थिक, शारीरिक व मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. त्याला आधार देण्याऐवजी गॅस, पेट्रोल, डिझेलची सातत्याने दरवाढ करून केंद्र सरकार सर्वसामान्य माणसाच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचे त्या म्हणाल्या. या आंदोलनात एटापल्ली तालुका महिला अध्यक्ष ललिता मडावी, शहर उपाध्यक्ष सरिता गावडे, युवती तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सभापती बेबीताई लेकामी आणि अन्य मान्यवर उपस्थित होत्या.

भावाला रिटर्न गिफ्टकाही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने गॅस सिलिंडरचे भाव २५ रुपयांनी वाढवून देशातील आपल्या सर्व भगिनींना रक्षाबंधनाची ओवाळणी दिली. वर्षभरात पंतप्रधान अधूनमधून आपल्या बहिणींना ही ओवाळणी महागाईच्या स्वरूपात देतच असतात. याच प्रेमाखातर आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेसमार्फत आपल्या प्रधानसेवकांना रक्षाबंधनाचं रिटर्न गिफ्ट म्हणून महागाईचे प्रतीक असलेल्या शेणाच्या गोवऱ्या पाठवल्या असल्याचे एटापल्ली शहर अध्यक्ष पौर्णिमा श्रीरामवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीMaharashtraमहाराष्ट्रCylinderगॅस सिलेंडरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसGovernmentसरकार