नक्षलवाद्यांकडून शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 22:25 IST2019-03-10T22:23:38+5:302019-03-10T22:25:04+5:30
कोरची पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या कोटगुल पोलीस मदत केंद्रातील ढोलडोंगरीच्या कोंबड बाजारात सशस्त्र नक्षलवाद्यांनी एका शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली.

नक्षलवाद्यांकडून शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या
कोरची (गडचिरोली) - कोरची पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या कोटगुल पोलीस मदत केंद्रातील ढोलडोंगरीच्या कोंबड बाजारात सशस्त्र नक्षलवाद्यांनी एका शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना संध्याकाळी 5.30 च्या सुमारास घडली. योगेंद्र मेश्राम असे मृतकाचे नाव असून ते परिसरातील बोटेजरी येथील कंत्राटी आरोग्य सेविकेचे पती असून गडचिरोली नगर परिषदेच्या जवाहरलाल विद्या मंदिरात कला शिक्षक म्हणून कार्यरत होते.
मेश्राम हे दर शनिवार-रविवारला कस्तुरबा चंदू देवगडे या आपल्या पत्नीकडे यायचे. आज नेहमीप्रमाणे ढोलडोंगरी येथे भालरलेल्या कोंबड बाजाराला गेले होते. ही संधी साधून नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. हत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. सदर गुन्ह्याची नोंद कोटगुल पोलीस मदत केंद्रात करण्यात आली.