तीन कोटींचे बक्षीस असलेला नक्षली नेता सुधाकर ठार; सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 05:58 IST2025-06-06T05:58:08+5:302025-06-06T05:58:23+5:30

नरसिंहचलम ऊर्फ सुधाकर (६९) याचा खात्मा करण्यात ५ जून रोजी जवानांना यश आले

Naxalite leader Sudhakar with a reward of Rs 3 crores killed; Encounter between security personnel and Naxalites | तीन कोटींचे बक्षीस असलेला नक्षली नेता सुधाकर ठार; सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

तीन कोटींचे बक्षीस असलेला नक्षली नेता सुधाकर ठार; सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

लोकमत न्यूज नेटवर्क, गडचिरोली: महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा व झारखंडमधील अनेक हिंसक माओवादी कारवायांचा सूत्रधार, जहाल नक्षली नेता आणि केंद्रीय समिती सदस्य नरसिंहचलम ऊर्फ सुधाकर (६९) याचा खात्मा करण्यात ५ जून रोजी जवानांना यश आले. छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. सुधाकरवर सहा राज्यांत मिळून सुमारे तीन कोटींचे बक्षीस होते. 

Web Title: Naxalite leader Sudhakar with a reward of Rs 3 crores killed; Encounter between security personnel and Naxalites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.