एटापल्लीमध्ये नक्षलवाद्यांचा धुडगूस; निर्माणाधीन पुलाच्या बांधकामावरील वाहनांची जाळपोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 15:54 IST2022-12-31T15:49:50+5:302022-12-31T15:54:19+5:30

एटापल्ली तालुक्यातील गट्टा मार्गावरील घटना

Naxalite burnt and vandalised vehicles at the construction site of the under-construction bridge at Etapalli Tehsil of Gadchiroli | एटापल्लीमध्ये नक्षलवाद्यांचा धुडगूस; निर्माणाधीन पुलाच्या बांधकामावरील वाहनांची जाळपोळ

एटापल्लीमध्ये नक्षलवाद्यांचा धुडगूस; निर्माणाधीन पुलाच्या बांधकामावरील वाहनांची जाळपोळ

एटापल्ली (गडचिरोली) : तालुक्यातील सुरजागड ते गट्टा मार्गावरील एका नाल्यावरच्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी उभ्या असलेल्या वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ आणि तोडफोड करण्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला.

शुक्रवारी मध्यरात्रीच ही जाळपोळ करण्यात आल्याचे सांगितले जाते. सदर नाल्यावर छोट्या पुलाचे बांधकाम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू होते. रात्री काही सशस्त्र नक्षलवाद्यांनी तिथे येऊन मिक्सर मशीनचे वाहन जाळले. त्यानंतर जेसीबी आणि इतर काही वाहनांची तोडफोड केली. शुक्रवारी भामरागड तालुक्यातील तुमरकोटी येथील गावपाटलाची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Naxalite burnt and vandalised vehicles at the construction site of the under-construction bridge at Etapalli Tehsil of Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.