नक्षल आॅपरेशनच्या हेलिकॉप्टरचे सारथ्य प्रथमच महिला पायलटकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:15 IST2017-12-10T00:14:59+5:302017-12-10T00:15:52+5:30
अलिकडच्या काही वर्षात पोलिसांच्या गाड्यांवर चालकाच्या सीटवर दिसणाºया महिला पोलीस शिपाई कुतूहलाचा विषय झाल्या होत्या.

नक्षल आॅपरेशनच्या हेलिकॉप्टरचे सारथ्य प्रथमच महिला पायलटकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अलिकडच्या काही वर्षात पोलिसांच्या गाड्यांवर चालकाच्या सीटवर दिसणाºया महिला पोलीस शिपाई कुतूहलाचा विषय झाल्या होत्या. पण आता नक्षलग्रस्त भागात प्रत्यक्ष युद्धजन्य परिस्थितीत पोलीस जवानांना ने-आण करण्यासोबतच जखमींना तातडीने उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाºया पोलिसांच्या हेलिकॉप्टरचेही सारथ्य एक महिलाच करणार आहे. मयुरी देशमुख असे त्या जाँबाज पायलटचे नाव आहे.
गेल्या ३ डिसेंबर रोजी गडचिरोली पोलिसांच्या सेवेत असलेल्या पवनहंस या सरकारी हेलिकॉप्टरवरची धुरा मयुरी यांनी सांभाळली आहे. निवृत्त आयपीएस अधिकारी शिवाजीराव बारवकर यांची नात असलेल्या मयुरीला हवाई सेवेचा वारसाच लाभला आहे. २००८ मध्ये अमेरिकेत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर २००९ मध्ये त्यांची पायलट म्हणून नियुक्ती झाली. त्यांचे वडिल विश्वासराव देशमुख हे सुद्धा भारतीय वायुसेनेत ग्रुप कॅप्टनपदी कार्यरत होते. मयुरीची लहान बहीण राधिकासुद्धा खासगी विमान कंपनीत पायलट आहे. मयुरी देशमुख यांनी एटापल्लीच्या भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालयात दहावीच्या विद्यार्थिनींसमोर आपले अनुभव सांगितले.
अन् दहावीच्या मुली भारावल्या
यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास व ध्येय गाठण्याची चिकाटी ठेवण्याचा सल्ला मयुरी यांनी भगवंतराव महाविद्यालयाच्या मुलींना दिला. आता या भागातील मुलींनीही घराबाहेर पडून पुरूषांच्या बरोबरीने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुलींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळे मुली भारावून गेल्या. यावेळी एसडीपीओ किरणकुमार सूर्यवंशी, पो.नि. आचेवार, प्राचार्य डॉ.एस.एन.बुटे, एस.एन.पठाण उपस्थित होते. संचालन प्रा. किशोर बुरबुरे यांनी केले.