शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

झाडाने अडविला राष्ट्रीय महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 5:00 AM

आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गालगत अनेक झाडे रस्त्याच्या बाजूने कललेली आहेत. ही झाडे रस्त्यावर केव्हाही कोसळू शकतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वादळवाऱ्यासह पाऊस झाल्यास या भागातील अनेक झाडे रस्त्यावर उन्मळून पडण्याची शक्यता आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास झिमेला फाट्याजवळ झाड कोसळल्याने या मार्गाने आवागमन करणारी अनेक वाहने रस्त्यात अडकून पडली. यामध्ये चारचाकी वाहने अधिक होती.

ठळक मुद्देसात तास खोळंबा : आलापल्ली-सिरोंचा महामार्गावरील झिमेलाजवळची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कगुड्डीगुडम : आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर झिमेला फाट्याजवळ रस्त्याच्या बाजूने कललेला एक झाड रविवारी पहाटेच्या सुमारास कोसळले. त्यामुळे पहाटे ५ वाजतापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. जवळपास दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत झाली नाही. त्यामुळे सात तास वाहतुकीचा खोळंबा झाल्याने चारचाकी वाहनांना प्रतीक्षा करावी लागली.आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गालगत अनेक झाडे रस्त्याच्या बाजूने कललेली आहेत. ही झाडे रस्त्यावर केव्हाही कोसळू शकतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वादळवाऱ्यासह पाऊस झाल्यास या भागातील अनेक झाडे रस्त्यावर उन्मळून पडण्याची शक्यता आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास झिमेला फाट्याजवळ झाड कोसळल्याने या मार्गाने आवागमन करणारी अनेक वाहने रस्त्यात अडकून पडली. यामध्ये चारचाकी वाहने अधिक होती.मार्गावर झाड कोसळल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. परंतु कोणताही अधिकारी घटनास्थळी फिरकला नाही. दुपारी १२ वाजेपर्यंत वाहनधारकांना ताटकडत राहावे लागले. शेवटी स्थानिक नागरिकांच्या मदतीने झाडाची विल्हेवाट लाऊन मार्ग मोकळा करण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.विशेष म्हणजे, याच मार्गावर झिमेला परिसरात आणखी दोन झाडे रस्त्याच्या बाजूने कललेली आहेत. ही झाडे वादळवाºयाने केव्हाही रस्त्यावर कोसळू शकतात. त्यामुळे भविष्यातसुद्धा वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने या मार्गावरील रस्त्याच्या बाजूने कललेल्या सर्व झाडांची विल्हेवाट संबंधित विभागाने लावावी, अशी मागणी झिमेलासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.पैैसे गोळा करून मजूर लावले कामालाझिमेला फाट्याजवळ रस्त्यावर कोसळलेल्या झाडामुळे तब्बल सात तास वाहतूक ठप्प झाली होती. परंतु झाडाची विल्हेवाट लावण्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने अखेर रस्त्यात अडकलेल्या वाहनधारकांनी प्रति वाहन ५० रूपये गोळा करून स्थानिक मजुरांच्या मदतीने झाडाची विल्हेवाट लावली.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा