युवकासोबत गेलेल्या महिलेची जंगलात हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 05:00 IST2021-10-13T05:00:00+5:302021-10-13T05:00:42+5:30
मृत महिला दि.२ ला एका युवकासोबत मोटारसायकलवर गेल्याची चर्चा परिसरात होती. ती परत न आल्यामुळे सर्वत्र शोधाशोध केली. पण ती दिसली नाही. त्यामुळे पती उदाराम दोनाडकर यांनी दि. ३ रोजी देसाईगंज पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी कुरूड येथीलच त्या युवकाला ताब्यात घेऊन बोलते करण्याचा प्रयत्न केला असता त्याने गळा दाबून त्या महिलेला जिवे मारल्याची कबुलीही पोलिसांकडे दिली होती.

युवकासोबत गेलेल्या महिलेची जंगलात हत्या
लाेकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : तालुक्यातील कुरूड येथून १० दिवसांपूर्वी, म्हणजे गेल्या २ ऑक्टोबरला गायब झालेल्या एका ३६ वर्षीय महिलेचा मृतदेह मोहटोला-शिरपूरच्या जंगलात आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. रोहिणी उदाराम दोनाडकर (३६ वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे.
सदर महिला कुरूड येथील कुंदन अशोक ठाकरे (२४ वर्षे) या युवकासोबत मोटारसायकलवर बसून गेली होती. त्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने गळा आवळून तिचा खून केल्याची कबुलीही दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
मृत महिला दि.२ ला एका युवकासोबत मोटारसायकलवर गेल्याची चर्चा परिसरात होती. ती परत न आल्यामुळे सर्वत्र शोधाशोध केली. पण ती दिसली नाही. त्यामुळे पती उदाराम दोनाडकर यांनी दि. ३ रोजी देसाईगंज पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी कुरूड येथीलच त्या युवकाला ताब्यात घेऊन बोलते करण्याचा प्रयत्न केला असता त्याने गळा दाबून त्या महिलेला जिवे मारल्याची कबुलीही पोलिसांकडे दिली होती. त्यानुसार, घटनास्थळ गाठून पाहणी केली असता तिथे काहीच आढळले नाही. त्यामुळे तो युवक दिशाभूल करीत असल्याचे वाटून पोलिसांनी त्याला सोडून दिले होते.
साडीवरून पटविली पत्नीची ओळख
घटनेच्या १० दिवसांनंतर मोहटोला-शिरपूरच्या जंगलात त्या बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला. दुपारी शिरपूर-मोहटोला येथील काही नागरिक मोहटोला-शिरपूरच्या जंगलात सिंधी आणण्यासाठी गेले असता मुख्य रस्त्यापासून अंदाजे १०० मीटर अंतरावर महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी दोनाडकर यांना घटनास्थळी नेऊन दाखविले. त्यांनी साडीवरून ती आपली पत्नीच असल्याचे सांगितले. या प्रकरणातील संशयित आरोपी कुंदन ठाकरे याला ताब्यात घेण्यात आले असून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक महेश मेश्राम यांनी सांगितले.