शहरं
Join us  
Trending Stories
1
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
2
CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट
3
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
4
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
5
Latest Marathi News LIVE Updates: "धारावीकरांना हुसकावून लावण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त...", काँग्रेस खासदारांचा गंभीर आरोप
6
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
7
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
8
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
9
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
10
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
11
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
12
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
13
Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!
14
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
15
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
16
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
17
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
18
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
20
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
Daily Top 2Weekly Top 5

सुरजागडच्या लोहप्रकल्प ठरणार ‘मुंगेरीलाल के हसीन सपनें’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:37 IST

विशेष म्हणजे आता लॉयड्स मेटल्सने या कामातून अंग काढून घेत त्रिवेणी अर्थमूव्हर्स या दाक्षिणात्य कंपनीकडे लोहदगड काढण्याची जबाबदारी ढकलल्यामुळे ...

विशेष म्हणजे आता लॉयड्स मेटल्सने या कामातून अंग काढून घेत त्रिवेणी अर्थमूव्हर्स या दाक्षिणात्य कंपनीकडे लोहदगड काढण्याची जबाबदारी ढकलल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात लोहप्रकल्प उभारला जाण्याचे स्वप्न जवळजवळ संपुष्टात आल्याचे मानले जात आहे. सुरजागड पहाडावरील लोहदगड काढण्याचे लीज मिळालेल्या लॉयड्स मेटल्सच्या गडचिरोली मेटल्स ॲन्ड मिनरल्स लि. या कंपनीने आपले काम सुरू करण्यापूर्वी, म्हणजे १५ वर्षांपूर्वी (दि. १२ जुलै २००५) जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या जनसुनावणीत अनेक स्वप्ने रंगविली होती. जिल्ह्यात लोहप्रकल्प उभारण्यासोबतच ९६५ नागरिकांना थेट रोजगार, तर जवळपास चार हजार नागरिकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल असे आमिष दाखवले होते; पण आता ज्यांनी ही सर्व स्वप्ने दाखविली त्या कंपनीनेच अंग काढून घेत तिसऱ्याच कंपनीला समोर केल्याने जनसुनावणीत सांगितलेल्या बाबींसाठी प्रशासन कोणाला जबाबदार धरणार, हा प्रश्न पुढे येत आहे.

एका अपघाताने स्थानिक नागरिकांचा विरोध उफाळून आल्यानंतर गेल्या अडीच वर्षांपासून लोहदगड काढण्याचे काम बंद आहे. पण आता हे काम पुन्हा सुरू करण्यासाठी लॉयड्स मेटल्सने त्रिवेणी अर्थमूव्हर्स या कंपनीला पुढे केले आहे. ही कंपनी जनसुनावणीत सांगितलेल्या बाबी बाजूला ठेवून आपल्या अटींवर लोकांशी करारनामे करीत असल्याने हा स्थानिक नागरिकांचा विश्वासघात ठरणार आहे.

पोलीस संरक्षणाविना काम करणार कसे?

विशेष म्हणजे कामावर ठेवणाऱ्या प्रत्येक कामगाराच्या जीविताची जबाबदारी संबंधित कंपनीची असते. मात्र त्रिवेणी कंपनी कोणतीही जबाबदारी घेण्यास तयार नाही. लॉयड्स मेटल्सला यापूर्वी दिलेल्या संरक्षणापोटी पोलीस विभागाचे जवळपास ४५ कोटी रुपये थकीत आहेत. ते मिळाल्याशिवाय या कामासाठी पोलिसांकडून संरक्षण मिळणार नाही. तरीही पोलीस संरक्षणाविना हे काम सुरू करण्याची हिंमत केली जात असल्यामुळे सदर कंपनीला कामगारांच्या जीविताशी घेणेदेणे नाही, की प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनीच त्यांना संरक्षणाची हमी दिली, अशी शंका घेतली जात आहे.