शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
6
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
7
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
8
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
9
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
10
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
11
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
12
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
13
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
14
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
15
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
16
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
17
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
18
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
19
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
20
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईची लोकल सुरू, मग गडचिरोलीत का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:52 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क देसाईगंज : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने २२ मार्चपासून देशात लाॅकडाऊन जाहीर केले. यात रेल्वे सेवाही बंद करण्यात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

देसाईगंज : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने २२ मार्चपासून देशात लाॅकडाऊन जाहीर केले. यात रेल्वे सेवाही बंद करण्यात आल्या. काेराेनाचा प्रभाव ओसरताच लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, देसाईगंजच्या वडसा रेल्वेस्थानकावरून धावणाऱ्या अनेक पॅसेंजर गाड्या अजूनही बंदच आहेत. एवढेच नाही तर या स्टेशनवरून धावणाऱ्या कोणत्याही सुपरफास्ट गाड्यांचा थांबा सुरू केला नाही. त्यामुळे हजारो प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करीत रस्ते मार्गाने प्रवास करावा लागत आहे.

देसाईगंज येथे जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे जिल्हाभरातील व नजीकच्या भंडारा जिल्ह्यातील नागरिक देसाईगंज येथूनच रेल्वेने पुढचा प्रवास करतात. वडसा-चांदाफाेर्ट, गाेंदिया- बल्लारशा, वडसा- नागभिड, चांदाफाेर्ट-गाेंदिया, बल्लारशा-गाेंदिया या रेल्वे देसाईगंज स्थानकावरून जातात. देसाईगंज रेल्वेस्थानकावरून दरदिवशी जवळपास १५०० प्रवासी ये-जा करतात. त्यात जवळपास ४०० पासधारक आहेत. दिवसाला जवळपास ४० हजार रुपयांचे उत्पन्न रेल्वेला उपलब्ध हाेत हाेते. याच मार्गावरून जसवंतपूर-काेरबा, सिकंदराबाद-दरभंगा या सुपरफास्ट रेल्वेही देसाईगंज रेल्वेस्थानकावर थांबत हाेत्या. लाॅकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर या सर्व सुपरफास्ट रेल्वे धावत आहेत. मात्र, देसाईगंज रेल्वेस्थानकावरील थांबा बंद करण्यात आला आहे. गया-चेन्नई ही रेल्वे नव्याने सुरू झाली आहे. दररविवारी ही रेल्वे देसाईगंजवरून जाते. मात्र, तिचाही थांबा ठेवण्यात आला नाही. काेराेनापूर्व काळापर्यंत या सर्व सुपरफास्ट एक्स्प्रेसचे थांबे देसाईगंज येथे असल्याने या ठिकाणावरून अनेक प्रवासी प्रवास करीत हाेते; परंतु आता थांबे रद्द केल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

बाॅक्स

सर्व सुरू झाले असताना पॅसेंजरच का बंद

लाॅकडाऊनमध्ये शिथिलता देताना सर्व बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये, उद्याेग, शहरी भागातील रेल्वे वाहतूक, बसगाड्या सुरू झाल्या आहेत. मात्र, रेल्वे मंत्रालयाने पॅसेंजर सुरू करण्याबाबत काेणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे रेल्वेचे नुकसान हाेत आहे. साेबतच प्रवाशांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. पॅसेंजर सुरू करण्यात यावी, तसेच पूर्वीप्रमाणेच सुपरफास्ट गाड्यांचे बसथांबे देसाईगंज येथे देण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून हाेत आहे.

काेट

काेराेनाच्या पार्श्वभूमीवरच सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले असावेत. पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याबाबत काेणताही पत्रव्यवहार करण्यात आला नाही. रेल्वे मंत्रालयाकडून कोणत्याही सूचना नाहीत.

- संजीवकुमार, स्टेशन प्रमुख