शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

जारावंडीत रस्त्यासाठी गावकºयांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:02 IST

एटापल्ली-जारावंडी मार्गाची दुरूस्ती करावी या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी जारावंडी येथील नागरिकांनी मंगळवारी रास्तारोको आंदोलन केले. त्याबरोबर व्यापाºयांनी बंद पाळून आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला.

ठळक मुद्देदिवसभर रास्ता रोको : एटापल्ली-जारावंडी मार्गाची दुरूस्ती करण्याची मागणी; व्यापाºयांनीही पाळला बंद

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्ली-जारावंडी मार्गाची दुरूस्ती करावी या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी जारावंडी येथील नागरिकांनी मंगळवारी रास्तारोको आंदोलन केले. त्याबरोबर व्यापाºयांनी बंद पाळून आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला.जारावंडी ते एटापल्ली हा एटापल्ली तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा व मुख्य मार्ग आहे. याच मार्गाने या परिसरातील कर्मचारी ये-जा करतात. एटापल्ली हे तालुका स्थळ असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनाही एटापल्ली येथे नेहमी ये-जा करावे लागते. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. मात्र या मार्गाची मागील अनेक वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी तर डांबराचे निशानसुद्धा शिल्लक नाही. खड्ड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने एक खड्डा चुकविताच दुसरा खड्डा येतो. त्यामुळे सर्वच वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. या मार्गाच्या दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकवेळा तक्रार करण्यात आली आहे. मात्र या मार्गाची दुरूस्ती करण्यात आली नाही. या मार्गावर अनेक ठेंगणे पुल आहेत. ठेंगण्या पुलांवरून पावसाळ्यात पाणी राहत असल्याने या मार्गावरील वाहतूकच ठप्प पडते. या कालावधीत एखात्या गंभीर रूग्णाला दवाखाण्यात पोहोचविणेही शक्य होत नाही. परिणामी त्याला जीव गमवावा लागतो. या सर्व अडचणी लक्षात घेवून या रस्त्याची दुरूस्ती व ठेंगण्या पुलांची दुरूस्ती करण्यात यावी या मुख्य मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे.जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके व पंचायत समिती सदस्य शालीकराम गेडाम यांच्या नेतृत्वात जारावंडी परिसरातील शेतकरी, शेतमजूर व नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केले. जारावंडी येथील वीर बाबुराव शेडमाके चौकात धरणे आंदोलन व चक्काजाम आंदोलन करण्यात आले. जक्काजाम आंदोलनामुळे वाहनांची मोठी रांग लागली होती. मंगळवारी एटापल्ली येथील आठवडी बाजार होता. या आंदोलनामुळे व्यापाºयांना आठवडी बाजारात पोहोचता आले नाही. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून एटापल्ली येथील व्यापाºयांनी दिवसभर बंद पाळला.आंदोलनात सरपंच सुधाकर टेकाम, शामल मडावी, मंदा गेडाम, सुनंदा उईके, वर्षा उसेंडी, माजी सरपंच हरिदास टेकाम, मनोहर हिचामी, मोहन नामेवार, दिलीप दास, तुळशिदास मडावी, अंतराम नरोटे, घनश्याम नाईक, दुलाल कुंडू, युवक काँग्रेसचे अंकित वरगंटीवार, अरूण तेलकुंटलवार आदी उपस्थित होते.जारावंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जाधव व सहाय्यक पोलीस निरिक्षक पेंढारकर यांच्या नेतृत्त्वात आंदोलनादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आदोलनकर्त्यांना स्थानबध्द करण्यात आले.