शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

थायरॉइड वाढतोय; २५ हजारांवर रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 3:46 PM

Gadchiroli : सकस आहाराची कमतरता, धावपळीची जीवनशैली कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सकस आहाराची कमतरता आणि धावपळीची जीवनशैली यामुळे विविध आजारांना आमंत्रण मिळत आहे. विशेष म्हणजे, महिलांमध्ये थायरॉइड आजाराचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाद्वारे करण्यात आलेल्या तपासणीअंतर्गत जिल्ह्यात जवळपास २५ हजारांवर महिलांना थायरॉइड असल्याचे आरोग्य विभागाच्या तपासणीत व उपचारात निदर्शनास आले आहे. आरोग्य विभागामार्फत रुग्णालयात निःशुल्क उपचार करून दिले जात आहेत.

थायरॉइड हा आजार वयाच्या तिशीनंतर महिलांमध्ये आढळून येतो. मात्र, अलीकडे सकस आहाराची कमतरता, तसेच बदललेल्या जीवनशैलीमुळे कमी वयातसुद्धा, तसेच मुलींमध्येदेखील हा आजार आढळून येत आहे. हार्मोन्समध्ये बदल व धावपळीचे जीवन यामुळे मुलींनाही थायरॉइड आजाराचा धोका बळावला आहे. शहरी भागातील शाळकरी किशोरवयीन मुलींमध्ये थायरॉइडचे प्रमाण दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक दक्षता बाळगत आहे. थायरॉइडग्रस्त रुग्णांना आता सर्व शासकीय रुग्णालयात मोफत परिपूर्ण औषधोपचार पुरविला जात आहे. पहिल्या टप्प्यात तपासणी, मोफत औषधोपचार तसेच रक्त चाचणी व त्यानंतरच्या विविध चाचण्या मोफत केल्या जातात. त्यामुळे निदान करण्यासाठी रुग्णांना अधिक खर्च येत नाही.

काय आहेत लक्षणे?सामान्यतः थॉयराइडची काही प्रमुख लक्षणे आहेत. यामध्ये वजन वाढणे, चेहरा व पायांना सूज येणे, अशक्तपणा जाणवणे, आळस येणे, भूक मंदावणे, जास्त झोप येणे, जास्त थंडी वाजणे, पाळीमध्ये बदल होणे (महिलांसाठी), केस गळणे, गर्भधारणेमध्ये समस्या उद्भवणे आदींचा समावेश आहे. असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य