बाधितांपेक्षा अधिक रूग्ण झाले काेराेनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:46 IST2021-04-30T04:46:56+5:302021-04-30T04:46:56+5:30
गडचिरोली : गुरूवारी काेराेना रूग्णांबाबत दिलासादायक बाब घडली आहे. जिल्हाभरात ५६१ नवीन काेराेनाबाधित आढळले आहेत तर ६०३ रूग्णांनी ...

बाधितांपेक्षा अधिक रूग्ण झाले काेराेनामुक्त
गडचिरोली : गुरूवारी काेराेना रूग्णांबाबत दिलासादायक बाब घडली आहे. जिल्हाभरात ५६१ नवीन काेराेनाबाधित आढळले आहेत तर ६०३ रूग्णांनी काेराेनावर मात केली आहे. मागील १५ दिवसात पहिल्यांदाच बाधितांपेक्षा काेराेनापासून मुक्त झालेेल्यांची संख्या अधिक आहे. गुरुवारी १२ जणांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे.
काेराेनाबाधितांची एकूण संख्या २० हजार ६५८ झाली आहे. त्यापैकी १५ हजार ६५० जणांनी काेराेनावर मात केली आहे. जिल्हयात एकूण ३८४ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. ४ हजार ६२४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
१२ नवीन मृत्यूंमध्ये ५५ वर्षीय पुरुष आंबेशिवनी गडचिरोली, देसाईगंज येथील ५८ वर्षीय पुरुष, ४६ वर्षीय महिला गडचिरोली, ४८ वर्षीय पुरुष जामगिरी (ता. चामोर्शी), ७५ वर्षीय महिला देसाईगंज, ६२ वर्षीय महिला लाखांदूर (जि. भंडारा), ५४ वर्षीय पुरुष सोनापूर, गडचिरोली, ७५ वर्षीय पुरुष वैरागड (ता. आरमोरी), ६५ वर्षीय पुरुष कडोली (ता. कुरखेडा), ३८ वर्षीय पुरुष बोडधा (ता. देसाईगंज), ५३ वर्षीय पुरुष इंजेवारी (ता. आरमोरी), ६३ वर्षीय पुरुष सिंदेवाही (जि. चंद्रपूर) यांचा समावेश आहे.
नवीन ५६१ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १३६, अहेरी तालुक्यातील ५६, आरमोरी १०, भामरागड तालुक्यातील १४, चामोर्शी तालुक्यातील ७३, धानोरा तालुक्यातील १७, एटापल्ली तालुक्यातील १८, कोरची तालुक्यातील १०, कुरखेडा तालुक्यातील ६२, मुलचेरा तालुक्यातील २४, सिरोंचा तालुक्यातील २८ तर वडसा तालुक्यातील ५३ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या ६०३ रूग्णांमध्ये गडचिरोलीमधील १७९, अहेरी ४५, आरमोरी ३८, भामरागड ३०, चामोर्शी ६३, धानोरा २७ , एटापल्ली ५०, मुलचेरा ४२, सिरोंचा ६, कोरची ३०, कुरखेडा ३४ तसेच वडसा येथील ५९ जणांचा समावेश आहे.