शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
3
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
4
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
5
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
6
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
8
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
9
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
10
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
11
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
12
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
13
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
14
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
15
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
16
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
17
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
18
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
19
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
20
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

चौडमपल्लीत मोहफूल, चंदनखेडी देशीचा अड्डा

By admin | Updated: May 29, 2015 01:10 IST

गडचिरोली पाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यातीलही दारू बंद झाल्याचा गैरफायदा उचलत दारूविक्रेत्यांनी तेलंगणा राज्यातून दारू आणणे सुरू केले आहे.

आष्टी : गडचिरोली पाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यातीलही दारू बंद झाल्याचा गैरफायदा उचलत दारूविक्रेत्यांनी तेलंगणा राज्यातून दारू आणणे सुरू केले आहे. आष्टी परिसरातील चौडमपल्ली हे मोहफूलाच्या दारूविक्रीचे तर चंदनखेडी हे देशी व विदेशी दारू मिळण्याचा अड्डा बनले आहे. या दोन्ही गावांमध्ये तळीरामांची सायंकाळच्या सुमारास जत्रा भरत असून यामुळे या दोन्ही गावांमधील शांतता भंग झाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारू सुरू असताना आष्टी परिसरातील तळीराम चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील तारसा येथे दारू पिण्यासाठी जात होते. या गावात देशी, विदेशी दारूची पाच दुकाने होती. हे गाव आष्टीपासून केवळ तीन किमी अंतरावर आहे. त्यामुळे आष्टी परिसरातील तळीरामांना खुलेआम दारू मिळत होती. मात्र १ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यातही दारूबंदी झाल्याने या सर्व दुकांनाचे शटर बंद झाले आहे. परिणामी आष्टी परिसरातील तळीरामांची फार मोठी गोची झाली आहे. त्यामुळे तळीरामांनी आता आपला मोर्चा अहेरी मार्गावरील चंदनखेडी व चौडमपल्ली येथे वळविला आहे. चौडमपल्ली येथे मोहफुलाची दारू मूबलक प्रमाणात मिळत असून चंदनखेडी हे देशी व विदेशी दारूचा मुख्य अड्डा बनला आहे. परिसरातील गावांना याच गावातून दारूचा पुरवठा केला जात आहे.
चंदनखेडी येथे आंध्रप्रदेशातून बैलबंडीच्या सहाय्याने नदीच्या मार्गाने दारू आणली जात आहे. मूबलक प्रमाणात दारू मिळत असल्याने या दोन्ही गावांकडे सायंकाळच्या सुमारास तळीरामांची रांग लागत असून गावाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तळीरामांमुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. काही दिवसांपूर्वी दारू पिऊन वाहन चालविताना एक वाहन महांकाली मंदिराजवळ पलटल्याची घटना घडली आहे. या दोन्ही गावांमध्ये खुलेआम दारू विकली जात असताना पोलीस मात्र केवळ बघ्याची भूमिका बजावित आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)