काेविड केंद्रातील स्थितीची आमदारांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:37 IST2021-04-24T04:37:00+5:302021-04-24T04:37:00+5:30
देसाईगंज शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ दिसून येत आहे. याशिवाय शहरात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज शहरातील ...

काेविड केंद्रातील स्थितीची आमदारांकडून पाहणी
देसाईगंज शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ दिसून येत आहे. याशिवाय शहरात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज शहरातील व्यक्ती काेराेनामुळे दगावत आहेत. त्यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण आहे. देसाईगंज शहरात सध्या गोकूळनगर व भगतसिंग वाॅर्डातील वसतिगृहात कोविड केंद्राची निर्मिती केली आहे. या ठिकाणी रुग्णांची हेळसांड होऊ नये त्यांना योग्य उपचारासह सकस आहार मिळावा, असे निर्देश आ. गजबे यांनी दिले. तसेच निरंतर कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टर, अधिपरिचारिका, मदतनीस, वाॅर्डबॉय यांचे मनोबल उंचावण्यासाठी कौतुक केले. याप्रसंगी डॉ. विद्या गेडाम, डॉ. प्रणय कोसे, डॉ. शुभांगी मस्के, डॉ. अस्मिता वाळके, प्रशिक नंदेश्वर, परिचारिका काजल गोंडाणे, मंजू चौधरी, सोनाली कुमरे, इब्राहिम पठाण आदी कर्मचारी उपस्थित हाेते.
===Photopath===
230421\23gad_3_23042021_30.jpg
===Caption===
आराेग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करताना आ. कृष्णा गजबे.