शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
2
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
3
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
4
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
5
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
6
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
9
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
10
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
11
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
12
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
19
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
20
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी केले अपंग आचलच्या यशाचे कौतुक

By admin | Updated: June 15, 2015 01:53 IST

तालुक्यातील घाटी येथील कै. विठ्ठलराव बनपुरकर विद्यालयात शिकत असलेल्या आचल प्रदीप राऊत या विद्यार्थिनीला दोन्ही हात नसल्याने

मार्गदर्शन : शिक्षणाधिकाऱ्यांसह घाटी गावाला दिली भेट
कुरखेडा : तालुक्यातील घाटी येथील कै. विठ्ठलराव बनपुरकर विद्यालयात शिकत असलेल्या आचल प्रदीप राऊत या विद्यार्थिनीला दोन्ही हात नसल्याने तिने उजव्या पायाने दहावीचा पेपर सोडवून ती विद्यालयातून प्रथम आली आहे. तिच्या या जिद्द, चिकाटी व मेहनतीचे आ. क्रिष्णा गजबे यांनी कौतुक केले.
दहावीच्या परीक्षेत आचलने ७७.४० टक्के गुण मिळवून ती विद्यालयातून प्रथम आल्याचे वृत्त वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित होताच आ. क्रिष्णा गजबे यांनी आचलचे घर गाठून तिचा शाल, श्रीफळ, डिक्शनरी व भेटवस्तू देऊन सत्कार केला. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) उल्हास नरड, प्रा. प्रशांत तम्मेवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष राम लांजेवार, जिल्हा उपाध्यक्ष विलास गावंडे, पं. स. सदस्य चांगदेव फाये, रामहरी उगले, किशोर पाचभाई, जलाल सय्यद आदी उपस्थित होते.
याप्रसंगी शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनीही आचलच्या या यशाचे कौतुक केले. आचलने शारीरिक अपंगत्व व घरच्या आर्थिक परिस्थितीवर मात केली आहे. तिचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार काढले. त्याचबरोबर तिच्या पुढील शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी तिचे आईवडील व गावकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)