सिरोंचातील पुलाला वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट

By Admin | Updated: December 27, 2016 01:54 IST2016-12-27T01:54:54+5:302016-12-27T01:54:54+5:30

महाराष्ट्र-तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवरील १६२० मीटर लांबीच्या पुलाचे ३०

The meeting of senior officers of Sironchhacha Pulao | सिरोंचातील पुलाला वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट

सिरोंचातील पुलाला वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट

महाराष्ट्र-तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवरील १६२० मीटर लांबीच्या पुलाचे ३० डिसेंबर रोजी राज्यपाल डॉ. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वी सोमवारी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सिरोंचा येथे भेट देऊन या भेटीपूर्वी तयारीची पाहणी केली व स्थानिक प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या. या परिसरात सुरक्षा व्यवस्थाही आतापासून कडक करण्यात आली आहे.

Web Title: The meeting of senior officers of Sironchhacha Pulao