शेतकऱ्यांची पावले धानाच्या मॅट नर्सरीकडे

By Admin | Updated: January 10, 2015 01:20 IST2015-01-10T01:20:55+5:302015-01-10T01:20:55+5:30

धान शेती आता परवडणारी राहिली नाही. शेतीचा खर्चही निघणे कठिण झाले आहे, असे सांगणारे अनेक शेतकरी आपल्याला दिसून येतात.

Matters to Farmers' Steps | शेतकऱ्यांची पावले धानाच्या मॅट नर्सरीकडे

शेतकऱ्यांची पावले धानाच्या मॅट नर्सरीकडे

कोरची : धान शेती आता परवडणारी राहिली नाही. शेतीचा खर्चही निघणे कठिण झाले आहे, असे सांगणारे अनेक शेतकरी आपल्याला दिसून येतात. मात्र अशा परिस्थितीतही शेतीतूनच नव्या समृद्धतेचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न काही शेतकरी करीत आहे. जिल्ह्यात मागील दोन वर्षांपूर्वी कृषी विभागाने यांत्रिकीकरणाचे वारे शेतकऱ्यांमध्ये शिरविल्यावर अनेक शेतकरी आता आधुनिक शेती तंत्रज्ञानाकडे वळत आहे. छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातही कृषी यांत्रिकीकरणाला सुरूवात झाली आहे.
कोरची तालुक्यातील बेलगाव घाट येथील मनिराम गुरनुले व इतर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा यांच्या मार्गदर्शनात तांत्रिक शेतीचा प्रयोग सुरू केला आहे. महिला शेतकरी समूह गटाच्या खरीप हंगामातील अनुभवावरून उन्हाळी भात लागवडीकरिता भाताची मॅट नर्सरी तयार करण्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. मॅट नर्सरीमुळे मजुरांवर होणारा अतिरिक्त खर्च, वेळेची बचत व तण नियंत्रणावर होणारा खर्च तसेच किड व रोगांपासून धानाचा बचाव व उत्पादन क्षमता वाढविणे आदी फायदे आता शेतकऱ्यांना या माध्यमातून मिळणार आहेत. त्यामुळे कोरची तालुक्यातही शेतकरी यांत्रिकी शेतीकडे वळत आहेत.
बेलगाव घाट येथे मनिराम गुरनुले या शेतकऱ्याच्या शेतात तालुका कृषी अधिकारी पी. के. जनबंधू, कृषी सहाय्यक बी. पी. मांदाडे, एस. एस. गावड, एस. ए. जाधव व महिला शेतकरी समूह गटाच्या अध्यक्ष रेखा कृष्णराव गावतुरे यांच्या उपस्थितीत मॅट नर्सरी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Matters to Farmers' Steps