शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटीचा इनाम असलेला माओवादी 'गणेश'चा खात्मा ; ओडिशा-छत्तीसगड सीमेवरील चकमकीत चार जण ठार

By संजय तिपाले | Updated: December 25, 2025 15:17 IST

Gadchiroli : छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या ओडिशा राज्यातील माओवादभावित भागात सुरक्षादलाने २५ डिसेंबर रोजी पहाटे मोठे यश मिळवले आहे.

गडचिरोली : छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या ओडिशा राज्यातील माओवादभावित भागात सुरक्षादलाने २५ डिसेंबर रोजी पहाटे मोठे यश मिळवले आहे. ओडिशा-छत्तीसगड सीमेवरील कंधमाल व गंजाम जिल्ह्याच्या सीमावर्ती जंगलात झालेल्या जोरदार चकमकीत दोन महिला माओवाद्यांसह चार माओवादी ठार झाले आहेत. यात संघटनेचा सेंट्रल कमिटी सदस्य व एक कोटी रुपयांचा इनामी कुख्यात माओवादी कमांडर गणेश उईके (६०) याचाही समावेश आहे.

ओडिशातील कंधमाल जिल्ह्यातील चाकपाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत व गंजाम जिल्ह्याला लागून असलेल्या रांभा जंगल परिसरात ही चकमक झाली. विशेष गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ओडिशा स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG), सीआरपीएफ आणि बीएसएफच्या संयुक्त पथकाने मोठ्या प्रमाणावर नक्षलविरोधी मोहीम राबवली. या मोहिमेत एकूण २३ पथके सहभागी होती.

मोहिमेदरम्यान  माओवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला, त्याला सुरक्षादलाने चोख प्रत्युत्तर दिले. चकमक संपल्यानंतर घटनास्थळावरून वर्दीधारी चार माओवादी,  दोन पुरुष व दोन महिलांचे मृतदेह आढळून आले. याठिकाणाहून दोन इन्सास रायफल व एक .३०३ रायफलही जप्त करण्यात आली आहे. ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये  गणेश उईके आहे. उर्वरित तिघांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

तीन दशकांपासून होती दंडकारण्यात दहशत

गणेश उईके हा गेल्या तीन दशकांपासून  दंडकारण्यातील आंध्र प्रदेश, ओडिशासह छत्तीसगडच्या बस्तर भागात माओवादी कारवायांमध्ये सक्रिय होता. अनेक गंभीर माओवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग असून, त्याच्यावर ओडिशा व छत्तीसगड पोलिसांनी एक कोटी ते १.१ कोटी रुपयांपर्यंतचे बक्षीस जाहीर केले होते. दरम्यान, या संपूर्ण कारवाईवर ओडिशा पोलिसांचे डीआयजी ऑपरेशन्स अखिलेश्वर सिंह यांनी थेट लक्ष ठेवले होते. चकमकीनंतर परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Maoist 'Ganesh', Carrying ₹1 Crore Reward, Killed in Encounter

Web Summary : Security forces killed four Maoists, including Central Committee member Ganesh Uike, in an Odisha-Chhattisgarh border encounter. Uike, carrying a ₹1 crore reward, had been active for three decades. Two women were also among the dead. Search operations continue in the area.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीCrime Newsगुन्हेगारी