शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

अनेक ठिकाणचे जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:18 AM

मोहफूल आणि तेंदपत्त्याचा हंगाम सुरू होताच जंगलात वणवे भडकण्यास सुरूवात झाली आहे. मंगळवारी पहाटे आलापल्ली आणि वडसा वनविभागांतर्गत अनेक बीटमध्ये आगी लागण्याच्या घटना उघडकीस आल्या. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी दिवसभर वनविभागाची धावपळ सुरू होती.

ठळक मुद्देदिवसभर वनविभागाची धावपळ : फायर ब्लोअरच्या वापराने वणव्यांवर नियंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मोहफूल आणि तेंदपत्त्याचा हंगाम सुरू होताच जंगलात वणवे भडकण्यास सुरूवात झाली आहे. मंगळवारी पहाटे आलापल्ली आणि वडसा वनविभागांतर्गत अनेक बीटमध्ये आगी लागण्याच्या घटना उघडकीस आल्या. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी दिवसभर वनविभागाची धावपळ सुरू होती.जंगलातीलआगीच्या घटनांची माहिती तत्काळ वनअधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी सॅटेलाईट अलर्टचा वापर केला जात आहे. त्यामुळे मध्यरात्री १.४६ च्या सुमारास वणवे लागल्याचा संदेश सॅटेलाईटने दिला. त्यात आलापल्ली वन विभागाअंतर्गत घोट क्षेत्रातील नरेंद्रपूर बीट, ठाकूरनगर बीट, घोट बीट, तसेच वडसा वन विभागातील पुराडा वनपरिक्षेत्रांतर्गत हडकिनार बीट, देलनवाडी वनपरिक्षेत्रांतर्गत मांगदा ब्लॉकमधील कुलकुली बीट, मालेवाडा वनपरिक्षेत्रातील रानवाही बीट आदी भागात एकाच दिवशी आगी लागल्या. त्यामुळे सदर आगी तेंदू हंगामासाठी मुद्दाम लावण्यात आल्याचे दिसून येत आहे.प्रत्येक वनवक्षकाकडे देण्यात आलेल्या फायर ब्लोअरच्या मदतीने जाळरेषा आखून वणव्यांवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू होते. बऱ्याच प्रमाणात आग आटोक्यात असली तरी काही भागात अजूनही वणवा धुमसत असल्याचे समजते.जाणीवपूर्वक जंगलातील पालापाचोळ्याला आग लावल्या जाऊ नये यासाठी वनविभागाकडून जनजागृती केली असली तरी त्याचा फारसा उपयोग झाल्याचे दिसून येत नाही.श्वापदांचा जीव धोक्याततेंदूपत्ता, मोहफूल संकलन करणाऱ्यांकडून आगी लावल्या जात असल्या तरी अनेक वेळा यात शिकाऱ्यांचेही फावते. वणव्यांमुळे गवत जळून खाक होते. त्यावर जगणारे तृणभक्षी प्राणी नष्ट होतात. आगीत छोट्या प्राण्यांचाही जीव जातो. सुपिकता वाढविणारा पालापाचोळा नष्ट झाल्याने जंगलाचे नुकसान होते. छोटे प्राणी नष्ट झाल्याने त्यावर जगणारे वाघ, बिबट्यासारखे प्राणी जंगलाबाहेर येऊन मानवी वस्तीलगत हल्ले करतात. यात अनेक वेळा शिकाऱ्यांचेही फावते. असे अनेक प्रकारचे नुकसान होत असताना आगी लावणाºयांवर कडक कारवाई होताना दिसत नाही.

टॅग्स :forestजंगलfireआग