शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

अत्यल्प मनुष्यबळावर आदिवासी महामंडळाचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:25 IST

गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने दरवर्षी खरीप व रबी हंगामात मोठ्या प्रमाणात धानाची खरेदी केली जाते. खरेदीच्या व्यवहारात ...

गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने दरवर्षी खरीप व रबी हंगामात मोठ्या प्रमाणात धानाची खरेदी केली जाते. खरेदीच्या व्यवहारात हुंड्या काढण्यापासून धान भरडाई, तसेच इतर सर्व कामे महामंडळामार्फत होतात. मात्र, महामंडळाच्या गडचिरोली येथील प्रादेशिक कार्यालयांतर्गत सर्वच पाच उपप्रादेशिक कार्यालयांत, तसेच प्रादेशिक कार्यालयांत अधिकारी व कर्मचाऱ्यांची मिळून २२० पैकी दीडशेवर पदे रिक्त आहेत. ७० टक्के पदे रिक्त असून, अत्यल्प कर्मचाऱ्यांवरच महामंडळाचा कारभार चालविला जात आहे.

गडचिरोली येथील प्रादेशिक कार्यालयात व्यवस्थापकासह उपव्यवस्थापक विपणन निरीक्षक व इतर सर्व मिळून एकूण ३१ पदे मंजूर आहेत. यापैकी १४ पदे भरण्यात आली असून, १७ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये व्यवस्थापक (प्रशासन) दोन पदे, उपव्यवस्थापक तीन पदे, लेखापालाची पाच, कनिष्ठ सहायकाची दोन, टंकलिपिकाची, तसेच गोदामपाल व इतरही पदे रिक्त आहेत. कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयात एकूण ४० पदे मंजूर आहेत. यापैकी केवळ पाचच पदे नियमित स्वरूपात भरण्यात आली आहेत. येथे तब्बल ३५ पदे रिक्त आहेत. उपप्रादेशिक व्यवस्थापकाला विपणन निरीक्षकाची आठ व इतर पदे रिक्त आहेत. घोट उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत ३६ पदे मंजूर असून, अत्यल्प पदे भरण्यात आली आहेत. या कार्यालयात बरीच पदे रिक्त आहेत. यामध्ये विपणन निरीक्षकाची सात, कनिष्ठ सहायक विक्रेत्याची तीन, रखवालदार व इतर पदांचा समावेश आहे. धानोरा उपप्रादेशिक कार्यालयात एकूण ३८ पदे मंजूर असून, सहापेक्षा अधिक पदे भरण्यात आली आहेत. येथे २५ वर पदे रिक्त आहेत. आरमोरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत एकूण ३६ पदे मंजूर आहेत. यापैकी केवळ सात पदे भरण्यात आली असून, २० वर पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. उपप्रादेशिक कार्यालय कोरची अंतर्गत ३९ पदे मंजूर आहेत. येथे अनेक पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये विपणन निरीक्षक, कनिष्ठ सहायक, रखवालदार व इतर पदांचा समावेश आहे.

आदिवासी विकास महामंडळांतर्गत आविका संस्थेच्या वतीने गडचिरोली कार्यालयाच्या क्षेत्रामध्ये यावर्षीच्या खरीप हंगामात ५० धान खरेदी केंद्रे सुरू आहेत. आतापर्यंत या केंद्रांवर माेठ्या प्रमाणावर धानाची खरेदी झाली आहे. या धानाच्या हुंड्या काढण्यापासून ऑनलाइन चुकारे, इतर कामांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, या कार्यालयांत मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. सातत्याने मागणी करूनही राज्य शासनाने महामंडळाच्या कार्यालयामध्ये भरती प्रक्रिया राबवून नवे अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले नाहीत. परिणामी कार्यालयाच्या प्रशासकीय कामकाजात बऱ्याचदा अडचणी येत आहेत.

प्रतवारीकारांची ४० पदे रिक्त

आविका संस्थेच्या केंद्रावर विक्रीसाठी येणाऱ्या धानाची प्रतवारी कोणती आहे, हे प्रतवारीकार आपल्या ज्ञानानुसार स्पष्ट करतो. मात्र, महामंडळाच्या कार्यालयात जिल्हाभरात ४० पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. यामध्ये कुरखेडा, घोट, धानोरा, आरमोरी, कोरची आदी उपप्रादेशिक कार्यालयांचा समावेश आहे. ५० धान खरेदी केंद्रांवर प्रतवारीकार असणे आवश्यक आहे. मात्र, नियमित प्रतवारीकारांची नियुक्ती करण्यात न आल्याने आविका संस्थांना ग्रेडर ठेवण्याची मान्यता शासनाने दिली आहे. त्यानुसार आविका संस्थांनी आपल्या स्तरावर ग्रेडर ठेवले आहेत.

अहेरी उपविभागातही अशीच स्थिती

आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत अहेरी येथे उच्च श्रेणी उपप्रादेशिक कार्यालय आहे. या उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड, सिरोंचा आदी पाच तालुक्यांच्या ग्रामीण व दुर्गम भागात जवळपास ३५ धान खरेदी केंद्रे आहेत. या सर्व धान खरेदी केंद्रांवर व व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी अहेरी कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर आहे. अहेरी उच्च श्रेणी कार्यालयात एकूण ९० पदे मंजूर आहेत. यापैकी केवळ २५ पेक्षा अधिक पदे भरण्यात आली असून, ६० पदे रिक्त आहेत. अहेरीपासून १३५ कि.मी. अंतरावरील आसरअल्ली धान खरेदी केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.