मामेसासऱ्याचा भाचेजावयाने घेतला जीव, रागाच्या भरात केला काठीने वार

By दिगांबर जवादे | Updated: July 23, 2023 20:48 IST2023-07-23T20:48:04+5:302023-07-23T20:48:55+5:30

आरोपी विरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्ह्याची नोंद करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

man killed by his nephew son-in-law in gadchiroli | मामेसासऱ्याचा भाचेजावयाने घेतला जीव, रागाच्या भरात केला काठीने वार

मामेसासऱ्याचा भाचेजावयाने घेतला जीव, रागाच्या भरात केला काठीने वार

गडचिराेली : मामेसासऱ्याच्या डाेक्यावर भाचेजावयाने काठीने जाेरदार प्रहार केल्याने मामेसासरा जागीच ठार झाला. ही घटना चामाेर्शी तालुकास्थळापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनापूर येथे रविवारी घडली. पाेलिसांनी आराेपीला अटक केली.

लहानू जगनाथ उराडे (६५, रा. सोनापूर) असे मृताचे नाव आहे तर शरद माधव वनकर (३७, रा. सोमनपल्ली) असे आराेपीचे नाव आहे. शरद हा गावातील अंगणवाडी जवळच्या बाकावर झोपला होता. उठवण्यासाठी त्याच्या डोक्यावर लहानुने मारले. यावरून शरद व लहानू यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. भांडणादरम्यान शरदने लहानूच्या डाेक्यावर काठीने जाेरदार वार केला. त्यात लहानू जागीच ठार झाला. चामाेर्शीचे पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुधीर साठे, तुषार पाटील यांनी घटनास्थळ गाठून आराेपीला अटक केली. आरोपीला तत्काळ ताब्यात घेण्यात आले. आरोपी विरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्ह्याची नोंद करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

Web Title: man killed by his nephew son-in-law in gadchiroli