शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
3
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
4
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
5
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
6
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
7
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
8
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
9
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
10
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
11
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
12
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
13
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
14
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
15
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
16
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
17
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
18
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
19
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
20
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री

आयएएस विद्यार्थी घडवा

By admin | Updated: July 11, 2016 01:22 IST

जिल्हा विकासाचा आराखडा आयएएस अधिकारी तयार करतात. नेते मंडळी केवळ सूचना करतात.

मारोतराव कोवासे यांचे प्रतिपादन : खेडेगाव शाळेत कार्यक्रमकुरखेडा : जिल्हा विकासाचा आराखडा आयएएस अधिकारी तयार करतात. नेते मंडळी केवळ सूचना करतात. जिल्ह्यात येणारे आयएएस अधिकारी जिल्ह्याबाहेरील असल्याने विकासाचा वस्तूनिष्ठ आराखडा तयार होत नाही. जिल्हा विकासाला गती देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील समस्यांची जाण असलेला गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी आयएएस अधिकाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे जिल्हाभरातील शिक्षण संस्थांनी आयएएस विद्यार्थी घडवावेत, असे आवाहन माजी खा. मारोतराव कोवासे यांनी केले. राणी दुर्गावती शिक्षण संस्था जोगीसाखराच्या वतीने खेडेगाव येथील मोहिनी हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी मंचावर सत्कारमूर्ती म्हणून आ. क्रिष्णा गजबे, माजी आ. हरिराम वरखडे तर प्रमुख अतिथी म्हणून राकाँचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, बाबासाहेब भातकुलकर, पी. आर. आकरे, प्रा. नरेंद्र आरेकर, पं. स. सभापती शामिना उईके, उपसभापती बबन बुद्धे, पं. स. सदस्य प्रभाकर तुलावी, चांगदेव फाये, परशुराम टिकले, गीता धाबेकर, विलास ढोरे, नवनाथ धाबेकर, नगरसेवक अ‍ॅड. उमेश वालदे, अर्चना वालदे, रवींद्र गोटेफोडे, विलास गावंडे, सरपंच टेमनशहा सयाम, राम लांजेवार, भूषण खंडाते आदी उपस्थित होते. याप्रसंगी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेचे संस्थापक माजी आ. हरिराम वरखडे यांना भेट वस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवरांनी शैक्षणिक गुणवत्तेबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहिनी हायस्कूलचे मुख्याध्यापक कापगते, संचालन केंद्रप्रमुख राजू वडपल्लीवार यांनी केले तर आभार किशोर तलमले यांनी मानले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)