पाेलिसांच्या प्रभावी अभियानाने माेडले नक्षलवादाचे कंबरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 05:00 IST2021-03-01T05:00:00+5:302021-03-01T05:00:37+5:30
पाेलीस महासंचालकांच्या हस्ते २७ फेब्रुवारी राेजी देचलीपेठा व धाेडराज येथे नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर पाेलीस उपमुख्यालय प्राणहिता येेथे भेट देऊन नक्षलविराेधी अभियानामध्ये उत्कृष्ट काम करून वेगवर्धीत पदाेन्नती मिळविलेल्या चार पाेलीस अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गाैरव करण्यात आला.

पाेलिसांच्या प्रभावी अभियानाने माेडले नक्षलवादाचे कंबरडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : गडचिराेली पाेलीस दलामार्फत प्रभावी माेहीम राबविल्याने मागील ३० वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या नक्षल चळवळीचे कंबरडे माेडले आहे. हे पाेलीस दलाचे फार माेठे यश आहे, असे गाैरवाेद्गार राज्याचे पाेलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी केले. पाेलीस महासंचालक यांनी २६ व २७ फेब्रुवारी राेजी गडचिराेली जिल्ह्यातील विविध पाेलीस स्टेशनला भेट दिली. तसेच विविध शाखांमध्ये चालणाऱ्या नक्षलविराेधी कामकाजाचा आढावा घेतला. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत हाेते.
पाेलीस महासंचालकांच्या हस्ते २७ फेब्रुवारी राेजी देचलीपेठा व धाेडराज येथे नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर पाेलीस उपमुख्यालय प्राणहिता येेथे भेट देऊन नक्षलविराेधी अभियानामध्ये उत्कृष्ट काम करून वेगवर्धीत पदाेन्नती मिळविलेल्या चार पाेलीस अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गाैरव करण्यात आला.
यावेळी महासंचालकांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे सेवेत असताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. पाेलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या साेडविल्या जातील, असे आश्वासन दिले. धानाेरा तालुक्यातील सावरगाव पाेलीस मदत केंद्रालाही पाेलीस महासंचालकांनी भेट देऊन जवानांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी गडचिराेली परिक्षेत्राचे पाेलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल, विशेष कृती दलाचे नीलम राेहण, अपर पाेलीस अधीक्षक मनीष कलवानिया, समीर शेख, साेमय मुंडे उपस्थित हाेते.
जिमलगट्टातील जवानांच्या समस्या जाणल्या
जिमलगट्टा: राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील देचलीपेठा पोलीस स्टेशनला भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी जवानांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासाेबत गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक मनीष कलवानिया, सोमय मुंडे ,जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड उपस्थित होते. बांधकामाचे भूमिपूजन महासंचालकांच्या हस्ते करण्यात आले. देचलीपेठा पोलीस ठाण्याला भेट देणारे ते पहिले पोलीस महासंचालक आहेत. बहुतांश पाेलीस जवानांचे कुटुंब साेबत नाही. कुटुंबीयांसाेबत बाेलण्यासाठी या भागात मोबाईलचे कव्हरेज उपलब्ध नाही. तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या यासह काही समस्या कर्मचाऱ्यांनी यावेळी मांडल्या. या सगळ्या समस्यांचे निराकरण लवकरच करण्याचे आश्वासन पोलीस महासंचालक यांनी दिले.