प्रेमी बनला दलाल ! प्रेमाच्या जाळ्यात ओढले, वेश्याव्यवसायात ढकलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 12:51 IST2025-06-10T12:49:37+5:302025-06-10T12:51:12+5:30

दिल्लीच्या 'मॉडेल'च्या आयुष्याची चित्तरकथा : ब्रह्मपुरीचा आरोपी जेरबंद

Lover turned broker! Dragged into the web of love, pushed into prostitution | प्रेमी बनला दलाल ! प्रेमाच्या जाळ्यात ओढले, वेश्याव्यवसायात ढकलले

Lover turned broker! Dragged into the web of love, pushed into prostitution

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
इंस्टाग्रामवर मैत्री करत आरोपीने एका परप्रांतीय मॉडेल तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून देसाईगंजमध्ये आणले. लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यानंतर तिला जबरदस्तीने देहव्यापारात ढकलले. ९ जून रोजी हा धक्कादायक प्रकार समोर आला. यातील आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आरोपीचे नाव मंजीत रामचंद्र लोणारे (४४, रा. गजानननगरी, ब्रह्मपुरी, जि. चंदपूर) आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित २६ वर्षीय महिला दिल्लीतील उत्तर-पूर्व परिसरातील आहे. सन २०१७मध्ये पीडितेचा विवाह झाला होता. तिला ६ व २ वर्षांची दोन मुले आहेत. मात्र, पतीसोबत पटत नसल्याने ३ मार्च २०२४ रोजी पतीने घटस्फोट घेतला. पतीपासून विभक्त झाल्यानंतर दोन मुलांसह ती आई वडिलांजवळ राहात होती. मॉडेलिंगची आवड असलेल्या या महिलेची इन्स्टाग्रामवरून २४ ऑगस्ट २०२४ रोजी मंजीत लोणारे याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांचा संवाद सुरू झाला. मॉडेलिंगच्या कामासाठी ती २७ डिसेंबर २०२४ रोजी नागपूरला आली. यावेळी मंजीतने तिला ब्रह्मपुरीला कुटुंबासोबत भेटण्यासाठी म्हणून बोलावले. दोन दिवस ती त्याच्या घरी राहिली. त्यानंतर ती दिल्लीला परतली. २८ मे रोजी देसाईगंज ठाण्यात गुन्हा नोंद झाला, पीडिता दोन महिन्यांची गर्भवती आहे.


प्रेम, लग्नाचे आमिष अन् धोका
मंजीत लोणारे याने पीडितेला आपले तुझ्यावर खूप प्रेम आहे, असे सांगून जाळ्यात ओढले. त्यानंतर आपल्या पत्नीशी फारकत घेऊन तुझ्याशी लग्न करेन, नवे घर घेऊ व एकत्रित राहू, असे वचनही दिले. त्याच्यावर विश्वास ठेवून १३ ऑक्टोबर २०२४ रोजी ती दिल्लीहून ब्रह्मपुरीत आली. मंजीत लोणारे तिला घेऊन तीन दिवस देसाईगंजच्या हॉटेल आर. आर. मध्ये राहिला. यादरम्यान त्याने वारंवार लैंगिक अत्याचार केला. 


इमोशनल ब्लॅकमेलिंग अन् ढकलले देहव्यापारात

  • घर घेण्यासाठी पैसे नाहीत, त्यामुळे आत्महत्या करावी लागेल, असे सांगून मंजीत लोणारे याने तिला वेश्याव्यवसायात ढकलले.
  • १८ नोव्हेंबर २०२४ रोजी त्याने देसाईगंजात लाखांदूर रोडवर एका सावजी हॉटेलला चिकटून किरायाने खोली केली, तेथे तिला वेश्याव्यवसायासाठी मजबूर केले.
  • नंतर देसाईगंजातील आर. आर. हॉटेल, कुरखेडातील महामाया हॉटेलातही वेश्याव्यवसाय करवून घेतला. त्यानंतर त्याने लग्नास नकार दिला व मारहाण करण्यास सुरुवात केली.

Web Title: Lover turned broker! Dragged into the web of love, pushed into prostitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.