व्यवसाय उभारण्यासाठी मिळते अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून ५० लाखांपर्यंत कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 15:25 IST2024-12-06T15:24:23+5:302024-12-06T15:25:59+5:30
आर्थिक योजना : मातंग समाजासह तत्सम जातीसाठी सवलत

Loan up to 50 lakhs is available from Annabhau Sathe Corporation for setting up business
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम १२ पोट जातीतील कुटुंबाची सामाजिक व आर्थिक प्रगती व्हावी यासाठी एनएसएफडीसी योजना राबविण्यात येते. सदर योजनेंतर्गत गरजू व पात्र लाभार्थांना ५ लाख ते ५० लाख रुपयांपर्यंत विविध व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.
मातंग समाज व तत्सम समाजातील १२ पोट जातीतील कुटुंबाची सामाजिक व आर्थिक प्रगती व्हावी यासाठी कर्ज योजना राबविली जात आहे. या समाजातील नागरिकांचा विकास व्हावा यासाठी योजना राबविली जात आहे. यासाठी कर्ज प्रस्ताव केंद्र शासनाने विकसित केलेल्या 'पीएम- सूरज' या पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने सादर करता येतो. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
कोणती कागदपत्रे आवश्यक?
कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (उत्पन्न मर्यादा : शहरी व ग्रामीण ३ लाखांपेक्षा कमी असावे) अर्जदाराचे छायाचित्र, शिधापत्रिका छायांकित प्रत, आधार कार्ड, यापूर्वी कर्ज/अनुदान न घेतल्यासंबंधी प्रतिज्ञापत्र जमीन / दुकानाच्या उपलब्धतेचा पुरावा (जिथे व्यवसाय करणार आहे त्या जागेचा पुरावा), जागा भाड्याने घेणार असल्याचा भाडेकरार, व्यावसायिक तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभव/प्रशिक्षणाचा पुरावा आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. अर्जदाराला ७५ टक्के एन.एस.एफ.डी.सी., २० टक्के बीजभांडवल (१० हजार रुपयांच्या अनुदानासह) व ५ टक्के अर्जदाराचा स्वतःचा सहभाग आवश्यक असतो.