कत्तलखान्यात जाणाऱ्या ८४ गोवंशांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:06 IST2018-03-01T00:06:21+5:302018-03-01T00:06:21+5:30
तीन ट्रकमधे भरून हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेल्या जात असलेल्या गोवंशांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून जीवदान दिले. ८७ पैकी ३ गोवंश मृत आढळली. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली.

कत्तलखान्यात जाणाऱ्या ८४ गोवंशांना जीवनदान
ऑनलाईन लोकमत
कोरची (गडचिरोली) : तीन ट्रकमधे भरून हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेल्या जात असलेल्या गोवंशांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून जीवदान दिले. ८७ पैकी ३ गोवंश मृत आढळली. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, कोरची तालुक़्यातील बजरंग दल कार्यकर्त्यांनी बेडगाव/टेमली फाट्याजवळ गोवंशांनी भरलेले तीन ट्रक पकडले. एमएच-२९-टी-००२९, टीएस-१२-यूबी ३३६० आणि एबी-२१-टीबी ४१६९ या तीन ट्रकमध्ये गायी व बैल कोंबून भरलेले होते. त्यांना थांबविल्यानंतर बेडगाव पोलीस मदत केंद्रातील पीएसआय चेतन ढेकने यांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ तिथे पोहोचून चौकशी केली असता तीन ट्रकमध्ये ८७ गोवंशांना कत्तलीसाठी नेत असल्याचे आढळले.
याप्रकरणी आरोपी शेख अख्तर शेख प्यारेसाहब (४२) रा. मुलनगर खलासी लाईन, शिवमंदिर रोड नागपूर, एमडीलाल चानपाशा मोहम्मद (३०) रा. असरगंज (तेलंगणा), अहमदमिया पाशामिया कुरेशी (३४) रा. मिर्झापूर (तेलंगणा) या तीन आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.
या कारवाईसाठी बजरंग दल शाखा कोरचीचे संयोजक विलास उईके, सहसंयोजक हेमराज दर्रो, नगरमंत्री विशाल गोटा, विद्यालय प्रमुख सतीश नुरूटी, नगर संयोजक वासू देवांगण, नरेंद्र सलामे, आकाश हिडामी, चंद्रशेखर सांडील, राहुल बेरूपवार, चेतन मेश्राम, अनुप बखर, महेश बखर, नंदू सोनार, ब्रितलाल बकचोरिया, अविनाश कुंभरे, चैनूराम फुलकुंवर, विकास सयाम, पुरूषोत्तम सांडील, हरीशचंद्र सहाडा आदींनी सहकार्य केले.
ब्रह्मपुरीच्या गोशाळेत पाठविले
या गोवंशांना ठेवण्यासाठी कोंडवाड्यातील जागा कमी पडणार असे दिसून आल्यानंतर गुन्हा दाखल करुन सर्व जनावरांना ब्रम्हपूरी (जि.चंद्रपूर) येथील गोशाळेत पाठविण्यात आले. आज सकाळी दोन ट्रकमधील जनावरे उतरवत असताना तीन जनावरे मृत आढळली.