शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

दारूची वाहतूक करणारे वाहन शासनाकडे जमा होणार

By admin | Updated: March 21, 2017 00:48 IST

अवैध दारू वाहतुकीस आळा बसविण्याकरिता वापरण्यात येणारी वाहने शासन जमा करण्याकरिता ...

अवैध दारू व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्णयगडचिरोली : अवैध दारू वाहतुकीस आळा बसविण्याकरिता वापरण्यात येणारी वाहने शासन जमा करण्याकरिता महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम १०० व १०१ अन्वये कारवाई करण्याच्या सूचना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे.होळी सणाच्या दरम्यान अवैध दारूविक्रेत्यांविरूद्ध जिल्ह्यात धडक मोहीम राबवून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने दोन चारचाकी वाहने जप्त करून १६ लाख रूपयांची अवैध दारू पकडली आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. सन २०१७ मध्ये १५ मार्च २०१७ पर्यंत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अन्वये ३६३ केसेस दाखल करून ४६७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १ कोटी ७२ लाख ८४ हजार ५२२ रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. कलम ९३ प्रमाणे ७५ आरोपींवर कलम ५६ प्रमाणे २ व एमपीडीए अ‍ॅक्ट १९८१ अन्वये एका आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. तसेच गोंदिया जिल्ह्याच्या केशोरी व मांडवखाल येथील परवानाधारक दारूविक्रेत्यांचे परवाने पोलीस अधीक्षकांच्या प्रस्तावानंतर गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली आहे.२०१६ मध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अन्वये १ हजार ५८६ केसेस दाखल करून १ हजार ९६३ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून ६ कोटी ३४ लाख ३६ हजार २८३ रूपयांचा माल जप्त करण्यात आला होता. कलम ९३ प्रमाणे २२५ आरोपींवर कलम ५६ प्रमाणे २२ जणांवर व एमपीए अ‍ॅक्टअंतर्गत दोघांवर कारवाई करण्यात आली, अशी माहितीही त्यांनी दिली. कारवाई झालेले राकेश रत्नवार रा. अहेरी व धर्मा रॉय रा. चामोर्शी यांना चंद्रपूर कारागृहात पाठविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)