भावाचा खून करणाऱ्यास जन्मठेप
By Admin | Updated: July 12, 2014 01:15 IST2014-07-12T01:15:31+5:302014-07-12T01:15:31+5:30
तालुक्यातील मुरमाडी येथील भास्कर केशव कोहपरे यांचा सख्खा भाऊ गिरीधर केशव कोहपरे याने २ जुलै २०१२ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ...

भावाचा खून करणाऱ्यास जन्मठेप
गडचिरोली : तालुक्यातील मुरमाडी येथील भास्कर केशव कोहपरे यांचा सख्खा भाऊ गिरीधर केशव कोहपरे याने २ जुलै २०१२ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास कुऱ्हाडीने वार करून जागीच ठार केले होते. भास्कर कोहपरे व गिरीधर कोहपरे यांच्यामध्ये जमिनीच्या वाटणीवरून वाद निर्माण झाला होता. मृतक भास्कर कोहपरे हे आपल्या घरी बसले असतांना आरोपी गिरीधरने भास्कर याला घरातून अंगणात फरफटत आणले. त्यानंतर त्याच्या शरीरावर कुऱ्हाडीने वार केला. यात भास्करचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणाची तक्रार मृतक भास्कर केशव कोहपरे यांची पत्नी राहुळाबाई कोहपरे यांनी केल्यानंतर ३ जुलै २०१२ रोजी पोलिसांनी आरोपी गिरीधरला अटक केली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक डी. जे. पाटील यांनी केला होता. या प्रकरणाचा निकाल ११ जुलै रोेजी लागला असून आरोपी गिरीधर कोहरपे याला जन्मठेप व १ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदर शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधिश डी. आर. शिरासाव यांनी सुनावली आहे. सरकारी वकील म्हणून एस. सी. मुनघाटे यांनी काम पाहिले आहे. अलीकडेच आरोपींना शिक्षा होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर खटल्याचे निकालही तत्काळ लागत आहेत. त्यामुळे आरोपींचे धाबे दणाणले आहेत.