शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

निम्म्यापेक्षा कमी वृक्ष जिवंत

By admin | Updated: September 10, 2014 23:39 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीच्यावतीने गावपरिसरात सन २०११-१२ ते २०१३-१४ या तीन वर्षात करण्यात आलेल्या वृक्षलागवडीची विशेष तपासणी हरित सेनेच्या शिक्षक

तपासणीत झाले उघड : वृक्ष संगोपनात ग्रामपंचायती फेलदिलीप दहेलकर - गडचिरोलीमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीच्यावतीने गावपरिसरात सन २०११-१२ ते २०१३-१४ या तीन वर्षात करण्यात आलेल्या वृक्षलागवडीची विशेष तपासणी हरित सेनेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आली. या तपासणीत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमार्फत लावण्यात आलेले निम्म्यापेक्षाही कमी वृक्ष जीवंत असल्याचे उघडकीस आले आहे. परिणामी तपासणीच्या प्राथमिक अहवालावरून लागवड केलेल्या वृक्षाचे योग्य संगोपन करण्यात साऱ्याच ग्रामपंचायती अपयशी ठरल्या असल्याचे दिसून येते.राज्यशासनाच्या निर्णयानुसार दरवर्षी ग्रामपंचायतीमार्फत गावपरिसरात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्षलागवड करण्यात येते. सदर वृक्षलागवडीचा कार्यक्रम दरवर्षी जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात राबविला जातो. यापूर्वी ग्रामपंचायतीच्या वृक्षलागवडीची तपासणी यंत्रणेमार्फत करण्यात आली होती. मात्र यंत्रणेने तयार केलेल्या तपासणी अहवालात पूर्णत: तथ्य आढळून आले नाही. त्यामुळे शासनाने निरपेक्ष विशेष वृक्षलागवड तपासणीची मोहीम हाती घेतली. या संदर्भात शासन निर्णय काढून हरित संरक्षक गटांमार्फत ग्रा. पं. च्या वृक्षलागवडीच्या तपासणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. या तपासणीकरिता हरित सेनेचे शिक्षक व विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. याबाबत जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी एक विशेष बैठक बोलावून वृक्षलागवड तपासणीच्या कार्यक्रमाचे नियोजन निश्चित करण्यात आले होते. या कार्यक्रमानुसार २५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीत शाळातील हरित सेनेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांमार्फत विशेष तपासणी करण्यात आली. शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेच्या सुटीच्या दिवशी वृक्षलागवड कार्यक्रमाची तपासणी करून अहवाल जि. प. प्रशासनाकडे सादर केला आहे. तपासणीअंती प्रशासनाकडे सादर केलेल्या अहवालावरून सन २०१२-१३ या वर्षातील ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या वृक्षलागवड कार्यक्रमातील जीवंत रोपट्याची टक्केवारी ३२.६५ आहे. तर सन २०१३-१४ या वर्षात लागवड करण्यात आलेल्या जीवंत रोपट्याची टक्केवारी ४३.५७ आहे. '